रेल्वेमंत्री
बालासोरा : ओडिसाच्या बालासोर इथे झालेल्या तीन ट्रेनच्या भीषण अपघातानंतर पुन्हा हळूहळू वाहतूक पूर्वपदावर येत आहे. 51 तासांनंतर पहिली ट्रेन रुळावरुन पुढे गेल्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्रेनसमोर हात जोडले. रविवारी रात्री 10 वाजून 45 मिनिटांनी पहिली ट्रेन रवाना झाली. यावेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव स्वत: तिथे उपस्थित होते. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट केले की, ‘खराब झालेली डाऊन लाईन पूर्णपणे पूर्ववत करण्यात आली आहे. सेक्शनमधून पहिली ट्रेन रवाना झाली. त्यानंतर काही वेळातच त्यांनी ट्विट केले की, अप मार्गावरही ट्रेनची हालचाल सुरू झाली आहे. शनिवारी रात्री आणि रविवारी 1,000 हून अधिक कर्मचारी आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर केलेल्या कामामुळे पुन्हा एकदा रेल्वे सेवा सुरू होऊ शकली. रेल्वेमंत्र्यांनी हात जोडून कामगारांचे आभार मानले आहेत. ट्रेन चालू झाल्यानंतर त्यांनी हात जोडून नमस्कार केला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ओडिशा ट्रेन दुर्घटनेमागे ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमध्ये बदल’, याचा अर्थ काय?रविवारी संध्याकाळपर्यंत, ढिगारा साफ करण्यात आला, त्यानंतर ट्रॅक चाचणीसाठी तयार झाला. सात पॉकेटिंग मशीन, 140 टन रेल्वे क्रेन आणि चार रोड क्रेन इथे काम करत होत्या. जवान, कामगार असे मिळून 1000 लोक इथे रात्रंदिवस सलग काम करत होते. त्यांच्यामुळे हे काम लवकर होऊ शकलं. त्यांचे आभार केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी मानले आहेत.
Train Accident : तीन नव्हे फक्त एकाच ट्रेनचा अपघात, रेल्वे बोर्डाची पत्रकार परिषदयावेळी बोलताना केंद्रीय रेल्वेमंत्री भावुक झाले होते. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, त्यांनी आपली जबाबदारी संपली नाही असंही बोलताना म्हटलं. शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कोरोमंडल एक्स्प्रेस, हावडा एक्स्प्रेस आणि मालगाडी या तिघांचाही अपघात झाला. एकमेकांवर ट्रेन धडकल्याने हा अपघात झाला. ज्यात 280 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला तर 900 हून अधिक प्रवासी जखमी झाले. गेल्या 20 वर्षातला हा सर्वात मोठा रेल्वे अपघात असल्याचं सांगितलं जात आहे.