बालासोर, 06 जून : बालासोर रेल्वे अपघातावर रेल्वे बोर्डाकडून आज सविस्तर माहिती देण्यात आली. यामध्ये केवळ कोरोमंडल एक्सप्रेसचा अपघात झाल्याचं जया सिन्हा यांनी सांगितलं . कोरोमंडल एक्सप्रेस लोखंडाने भरलेल्या मालगाडीवर आदळली. हा अपघात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती असल्याचंही त्या म्हणाल्या. रेल्वे बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी बहानागा स्टेशनवर येत होती. तिचा अपघात झाला, त्यामुळे स्टेशनवर उभा असलेली मालगाडी आणि तिथून जाणाऱ्या गाडीलाही नुकसान झालं. ज्या गाड्या स्टेशनवर थांबत नाहीत मधोमध असणाऱ्या मेन लाईनवरून जातात. तर एखाद्या गाडीला थांबवायचं असेल तर लूप लाईन असते. दोन मेल गाड्या जाणार होत्या. चेन्नईकडून यशवंतपूर एक्सप्रेस येत होती. तर शालिमारहून कोरोमंडल येत होती. दोन्ही एक्सप्रेससाठी मार्ग आणि सिग्नल सेट होते. ग्रीन सिग्नल होते म्हणजेच त्यांना मार्ग मोकळा आहे. 130 किमी प्रतितास वेगाने जाण्याची परवानगी असते. कोरोमंडलचा वेग 128 किमी तर शालिमारचा वेग 126 होता. सिग्नल ग्रीन होता आणि त्यांना थेट जायचं होतं. प्राथमिक माहितीनुसार सिग्नलमध्ये बिघाड आढळून आला. ही प्राथमिक माहिती आहे, सध्या चौकशी सुरू आहे. त्याचा अहवाल आल्याशिवाय थेट सांगता येणार नाही असंही जया सिन्हा यांनी सांगितलं. Train Accident : बालासोर दुर्घटना कशामुळे घडली? रेल्वेमंत्र्यांनी पहिल्यांदाच सांगितलं कारण अपघात फक्त कोरोमंडल एक्सप्रेसचा अपघात झाला. ट्रेनचं स्पीड त्यावेळी जवळपास १२८ किमी प्रतितास इतकं होतं. तीन ट्रेनची धडक झाली नाही. एकाच रुळावर गाड्या आल्या नव्हत्या. फक्त एकाच ट्रेनचा अपघात झाला. अपघातानंतर ती मालगाडीला धडकली. मालगाडीत लोखंड भरलेलं होतं. त्यामुळे या अपघाताची तीव्रता वाढली. त्याचा परिणाम कोरोमंडल एक्सप्रेसला बसलेला धक्का प्रचंड होता असंही जया सिन्हा म्हणाल्या. कोरोमंडल एक्सप्रेस ही सर्वात सुरक्षित ट्रेन मानली जात असतानाही यात इतकी जिवितहानी कशी झाली याबद्दलही जया सिन्हा यांनी माहिती दिली. जया सिन्हा यांनी सांगितलं की, कोरोमंडल ही एलएचबी ट्रेन आहे. सर्वाधिक सुरक्षित अशी ही ट्रेन आहे. अशा प्रकारच्या ट्रेन फुल स्पीडने असल्या आणि अपघात झाला तरी ट्रेनमधील प्रवाशांना जास्त दुखापत होत नाही. पण या प्रकरणात हा अपघात असा झाला की मालगाडीत लोखंड होते. या धडकेत मालगाडीला जास्त नुकसान झालं नाही. पण धडकेत पूर्ण इम्पॅक्ट ट्रेनवर आला. त्यामुळे कोरोमंडलचे काही डबे डाऊन लाइनवर घसरले. त्याचवेळी यशवंतपूर एक्सप्रेस १२६ च्या स्पीडने जात होती. अवघ्या काही सेकंदासाठी तिचे शेवटचे दोन डबे मागे होते त्याला धक्का लागून दोन्ही डबे घसरले. हे इतक्या वेगात होतं की त्यातील काही लोकांना दुखापत झाली आणि काहींचा जीवही गेला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.