JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / निजामुद्दीन परिषदेत सहभागी झालेल्या 441 लोकांमध्ये Coronavirus ची लक्षणं; 2000 जण क्वारंटाइन

निजामुद्दीन परिषदेत सहभागी झालेल्या 441 लोकांमध्ये Coronavirus ची लक्षणं; 2000 जण क्वारंटाइन

निजामुद्दीन परिषद (Nizamuddin Meet) झालेला संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 31 मार्च : देशभरात सध्या दिल्लीच्या निजामुद्दीन येथील तब्लिगी जमात परिषदेमुळे (Nizamuddin Meet) भीतीचं वातावरण आहे. 13 ते 15 मार्च दरम्यान फक्त देशातील विविध राज्यांमधूनच नव्हे तर परदेशातूनही लोकं हजर होते. त्यांनी निजामुद्दीनमधील तब्लिगी मारकझला भेट दिली. दरम्यान, येथे जमलेल्या बर्‍याच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं आहे. या परिषदेत सहभागी झालेल्या 9 जणांचा मृत्यू झाला आहे, यामध्ये तेलंगणातील 6 तर कर्नाटक, तामिळनाडू, जम्मु काश्मीर आणि मुंबईतील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तामिळनाडूत 50 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत. त्यापैकी 45 जणांचा निजामुद्दीनशी संबंध असल्याचं दिसून आलं आहे. तर 441 जणांमध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसून आलीत, अशी माहिती दिल्ली सरकारने दिली आहे. यानंतर तब्बल 2,100 पेक्षा अधिक रुग्णांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. हे वाचा -  #BREAKING: महाराष्ट्रात थैमान! कोरोनाग्रस्तांचा आकडा गेला 300 पार, एकट्या मुंबईत वाढले 67 रुग्ण गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, “1,746 लोकं या परिषदेत सहभागी झाले होते. त्यापैकी 216 परदेशी आणि 1,530 भारतीय नागरिक तिथं राहत होते. जवळपास 824 विदेशी नागरिकांनी देशातील विविध भागातील कार्यक्रमात सहभाग घेतला होतो.  सर्व राज्यांच्या पोलिसांना 21 मार्चला या 824 विदेशी नागरिकांची माहिती पाठवण्यात आली आहे.  शिवाय भारतीय तब्लीक जमातीच्या कर्मचाऱ्यांची नावं मिळवण्याच्या सूचना देण्यात 28 मार्चला आल्यात, जेणेकरून या सर्वांची वैद्यकीय चाचणी होईल आणि त्यांना क्वारंटाइन केलं जाईल” देशात आतापर्यंत कोरोनाव्हायरसची 1,315 प्रकरणं आहेत. त्यापैकी 1,176 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या एका परिषदेमुळे देशभरात कोरोना पसरण्याची शक्यता आहे. सध्या दिल्ली सरकारच्या वतीने मौलाना यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहेत. तब्लिगी म्हणजे काय? तब्लिगीचा अर्थ शिक्षणाचे आणि मुख्य कार्यालयाचे रूपांतर धर्माचा विस्तार करणे. निजामुद्दीनमध्ये असलेले हे केंद्र मुस्लिमांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. 13 ते 15 मार्च दरम्यान येथे मोठ्या संख्येने लोकं उपस्थित होती.लॉकडाऊनच्या वेळी येथे 1500 लोक उपस्थित होते. हे वाचा -  निजामुद्दीनच्या परिषदेत होते 1830 लोक, महाराष्ट्रासह 19 राज्यांत पसरला कोरोना

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या