JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / एका महिनात चौथा हल्ला, बगदादमध्ये अमेरिकन दूतावासाजवळ डागले 5 रॉकेट

एका महिनात चौथा हल्ला, बगदादमध्ये अमेरिकन दूतावासाजवळ डागले 5 रॉकेट

इराणमध्ये तनाव वाढल्यानंतर बगदादमधील अमेरिकन दूतावासाजवळ हल्ल्याची मालिका सुरू झाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बगदाद,26 जानेवारी: इराकचा राजधानी बगदादमध्ये रविवारी रात्री अमेरिकन दूतावासाजवळ पाच रॉकेट डागण्यात आले आहे. अद्याप या हल्ल्याची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही. एका महिण्यात अमेरिकन दूतावासाजवळ करण्यात आलेला हा चौथा हल्ला आहे. वृत्त संस्था ‘एएफपी’ने सुरक्षा यंत्रणेच्या हवाल्याने दिले आहे. इराणमध्ये तनाव वाढल्यानंतर बगदादमधील अमेरिकन दूतावासाजवळ हल्ल्याची मालिका सुरू झाली आहे.

संबंधित बातम्या

अमेरिकेच्या हल्ल्यात कदस फोर्सचा प्रमुख ठार दरम्यान, अमेरिकेने केलेल्या रॉकेट हल्ल्यात इराकची राजधानी बगदादमध्ये कदस फोर्सचा प्रमुख मेजर जनरल कासिम सुलेमानी ठार झाला होता. सुलेमानी त्याच्या फौजेसह बगदाद एअरपोर्टकडे कूच करत होता तेव्हा अमेरिकेने हवाई हल्ला केला. या हल्ल्यामध्ये पॉप्युलर मोबलायझेशन फोर्सचा डेप्युटी कमांडर अबू महदी अल मुहांदिस हा देखील ठार झाल्याचे सांगण्यात आले होते. कासिम सुलेमानी पश्चिम आशियात इराणी कारवायांमागचा सूत्रधार मानला जात होता. त्यानेच सिरियामध्ये आपले जाळे पसरवले होते. तसेच इस्रायलमध्ये रॉकेट हल्ला करण्याचाही आरोप त्याच्यावर होता. अमेरिका मागील काही दिवसांपासून त्याच्या मागावर होती. इराकने घेतला हल्ल्याचा बदला.. कासिम सुलेमानीच्या मृत्यूनंतर इराकने बगदाद येथील अमेरिकन दूतावासवर 7 आणि 8 जानेवारीला क्षेपणास्त्र हल्ला केला होता. इराणचा सुप्रीम लीडर अली हसन खामेनेईने देखील सुलेमानी याच्या हत्येनंतर पश्चिम आशियामधील सर्व अमेरिकन जवानांना आपल्या रडारवर घेतल्याचा दावा केला होता. 7 जानेवारीला इराणने इराकमधील दोन अमेरिकन लष्कराच्या तळावर तब्बल 22 क्षेपणास्त्र डागले होते. इराणने हाही दावा केला होता की, अनबर प्रांतात ऐन अल-असद एअर बेस आणि इरबिलच्या एका ग्रीन झोनवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात अमेरिकेचे 80 जवान ठार झाले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या