JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / आज विकेण्डलाही राज्यात होणार मुसळधार पाऊस, 24 तासांसाठी या शहरांना अलर्ट जारी

आज विकेण्डलाही राज्यात होणार मुसळधार पाऊस, 24 तासांसाठी या शहरांना अलर्ट जारी

मुसळधार पावसामुळे अनेक शहरांना जोडणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 ऑगस्ट : राज्यात गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अशात पालघर, ठाणे, नाशिक, नगर जिल्हात पुढील 24 तासांत काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज कुलबा वेधशाळेन वर्तविला आहे. मुंबईत काही भागात मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज आहे. तिकडे पूर्व विदर्भात मुसळधार पावसानं हाहाकार उडाला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक शहरांना जोडणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत. विदर्भ, मराठवाडा मागातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. पूर्व विदर्भात मुसळधार पावसानं हाहाकार मांडला आहे. अनेक शहरांना जोडणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सीमेवरील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अशात भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याची माहिती देण्यात येत आहे. ‘काही काँग्रेस नेत्यांना राज्यात शिवसेना सोबत नको आहे’ भंडारा शहराला लागून असलेल्या वैनगंगा नदी आणि शहरात पावसाने कहर केला आहे. त्याचा ड्रोननी टिपलेला एक व्हिडिओही समोर आला आहे. वैनगंगा नदी पुलावरून पाणी वाहत असल्याने आष्टी-चंद्रपूर मार्ग बंद करण्यात आला आहे. चंद्रपुरचा दक्षिण गडचिरोलीसोबत असलेल्या गावांचा संपर्क खंडीत झाला असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. राज्यात E pass बंद होण्याची शक्यता कमीच, विजय वड्डेटीवारांनी दिली मोठी माहिती मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी, भीषणता दाखवणारा VIDEO सतत चालू असलेल्या पावसामुळे गोसेखुर्द धरनाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असल्याने गोसेखुर्दचे पाणी सोडले असल्याने वैनगंगेच्या पात्रात पाणी वाढले. त्यामुळे आष्टी नदीवरील पूल उंच नसल्याने त्यावर रात्री 2 वाजता पासून पाणी वाहने सुरू झाले आहे. त्या करीता वाहतूक बंद आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या