JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / …तर पतंजलीवर कडक कारवाई करणार, अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांचा इशारा

…तर पतंजलीवर कडक कारवाई करणार, अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांचा इशारा

‘कोरोनीलचा वापर फक्त रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे औषध म्हणून केला जाऊ शकतो. या औषधामुळे कोरोना बरा होत नाही याची नोंद जनतेने घ्यावी.’

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 3 जुलै: पतंजलीने बाजारात आणलेल्या कोरोनील नावाच्या औषधाने कोरोना बरा होत नाही. पतंजलीने या औषधामुळे कोरोना बरा होतो असा जनतेत संभ्रम निर्माण केल्यास अथवा जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करू असा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिला आहे. गृह विभागाच्या मदतीने औषधे व जादूटोणादी उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा 1954 नुसार कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. या औषधामुळे कोरोना बरा होतो असा संभ्रम जनतेमध्ये निर्माण करुन त्यांची दिशाभूल होत आहे. प्रत्यक्षात पतंजलीने तयार केलेले औषध कोरोनील हे अश्वगंधा, तुळस व गुळवेल वापरून तयार केलेली गोळी (tablet) असून तिचा उपयोग रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी होतो. आयुष मंत्रालयाने सुद्धा रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी वरील औषधाची अश्वगंधा, तुळस, गुळवेल हे घटक समाविष्ट असल्याने शिफारस केली आहे. प्रत्यक्षात यामुळे कोरोना बरा होत नाही. भाजपकडून केंद्रात जबाबदारी देण्याचे संकेत, पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया कोरोनील हे औषधासाठी दिलेले नाव(कोरोना+निल) व प्रसार माध्यमातून होत असलेल्या जाहिरातीमुळे जनतेची दिशाभूल व संभ्रम निर्माण होत आहे. कोरोनीलचा वापर फक्त रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे औषध म्हणून केला जाऊ शकतो. या औषधामुळे कोरोना बरा होत नाही याची नोंद जनतेने घ्यावी, असे आवाहनही डॉ. शिंगणे यांनी केले आहे. COVID-19चा धोका वाढल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा Lockdownचा निर्णय काही दिवसांपूर्वी पतंजलीने कोरोना बरा होता असं सांगत नवं औषध बाजारात आणलं होतं. त्यानंतर वाद निर्माण झाला होता. आयुष मंत्रालयानेही त्याच्या जाहीरातींवर बंदी घातली होती. नंतर मात्र प्रतिकारशक्ती वाढविणारं औषध म्हणून त्याची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. संपादन - अजय कौटिकवार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या