नवी दिल्ली, 14 मे : वाढत्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यात आलं आहे. गृह मंत्रालयानं लॉकडाऊन 4.0 साठी एक नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. गृह मंत्रालयाच्या नवीन सूचनांनुसार संध्याकाळी 7 ते सकाळी 7 या वेळेत अत्यंत महत्त्वपूर्ण कामांना वगळता शहरात कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. रात्री अत्यंत महत्वाच्या कामांसाठी प्रवासाला परवानगी मिळेल. स्थानिक अधिकारी त्यांच्या संपूर्ण कार्यक्षेत्रात या संदर्भात आदेश जारी करतील. मार्गदर्शक सूचनांनुसार, सीआरपीसी कलम 144 आणि इतर कालावधीत सुरू राहतील. याचा अर्थ असा की या काळात रात्रीचा कर्फ्यू असेल आणि सर्व प्रकारच्या हालचालींवर बंदी कायम राहील. गृह मंत्रालयानं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये असं स्पष्टपणं सांगितलं गेलं आहे की, 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती, आजारी, गर्भवती महिला, दहा वर्षांखालील मुलांना घरीच रहावं लागेल. केवळ गंभीर आरोग्याच्या संकटाच्या परिस्थितीतच क्रियाकलापांना अनुमती दिली जाईल. कोरोनाचं थैमान! राज्यात एका दिवसात आढळले 2347 रुग्ण, ही आहे लेटेस्ट आकडेवारी केंद्र सरकारने जारी केलेल्या तत्त्वांमध्ये मेट्रो, विमान सेवा बंद राहणार असल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर शाळा, कॉलेज शॉपिंग मॉल्स, धार्मिक स्थळं, धार्मिक कार्यक्रम, हॉटेल्स आणि सिनेमाहॉल त्याचबरोबर जीम बंददेखील बंदच राहणार आहे. तर रेड झोन, ग्रीन झोन आणि ऑरेंज झोन संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारांना देण्यात आले आहेत. राज्य सरकार आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या गाईडलाईननुसार झोनचा निर्णय घेणार आहे. Cyclone Amphan : अम्फान चक्रीवादळाचा धोका वाढला, या राज्यांत NDRFच्या 17 तैनात महाराष्ट्रात कोरोनाचं थैमान कोरोनाव्हायरसमुळे देशात हाहाकार माजला असताना महाराष्ट्र कोरोनाचे सर्वाधित रुग्ण समोर आले आहेत. आज महाराष्ट्रात 2347 नवीन कोरोना प्रकरणं नोंदली गेली आहेत. महाराष्ट्रात संक्रमणाची एकूण संख्या 33,053 वर पोहोचली आहे. या धक्कादायक आकडेवारीमुळे नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे. महाराष्ट्रातील एका दिवसातील कोरोनाचे हे सर्वाधिक प्रकरणं आज समोर आली आहेत. आज राज्यात 63 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर एकूण मृतांचा आकडा 1198 वर पोचला आहे. त्याचवेळी मुंबईत कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 20 हजारांच्या पुढे गेली आहे. मुंबईत कोरोनाचे आतापर्यंत 20150 संक्रमित रूग्ण आहेत तर 734 लोकांचा बळी गेला आहे. लॉकडाऊन 4.0 साठी केंद्राची नियमावली जारी, 31 तारखेपर्यंत या आहेत अटी