कोरोनाचं थैमान! राज्यात एका दिवसात आढळले 2347 रुग्ण, ही आहे लेटेस्ट आकडेवारी

कोरोनाचं थैमान! राज्यात एका दिवसात आढळले 2347 रुग्ण, ही आहे लेटेस्ट आकडेवारी

मुंबईत कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 20 हजारांच्या पुढे गेली आहे. मुंबईत कोरोनाचे आतापर्यंत 20150 संक्रमित रूग्ण आहेत तर 734 लोकांचा बळी गेला आहे.

  • Share this:

मुंबई, 17 मे : कोरोनाव्हायरसमुळे देशात हाहाकार माजला असताना महाराष्ट्र कोरोनाचे सर्वाधित रुग्ण समोर आले आहेत. आज महाराष्ट्रात 2347 नवीन कोरोना प्रकरणं नोंदली गेली आहेत. महाराष्ट्रात संक्रमणाची एकूण संख्या 33,053 वर पोहोचली आहे. या धक्कादायक आकडेवारीमुळे नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे.

महाराष्ट्रातील एका दिवसातील कोरोनाचे हे सर्वाधिक प्रकरणं आज समोर आली आहेत. आज राज्यात 63 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर एकूण मृतांचा आकडा 1198 वर पोचला आहे. त्याचवेळी मुंबईत कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 20 हजारांच्या पुढे गेली आहे. मुंबईत कोरोनाचे आतापर्यंत 20150 संक्रमित रूग्ण आहेत तर 734 लोकांचा बळी गेला आहे.

वाईन शॉपबाहेर तैनात दोन पोलिसांना कोरोनाची लागण, धोका वाढला

कोरोना व्हायरसची ही वाढती साखळी थांबवण्यासाठी देशात चौथ्या टप्प्यात लाकडाऊन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर केंद्र सरकारकडूनही सर्व राज्यांमध्ये 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा आदेश देण्यात आला आहे. याआधी सलग तीन वेळा लॉकडाऊन वाढवण्यात आला होता.

Cyclone Amphan : अम्फान चक्रीवादळाचा धोका वाढला, या राज्यांत NDRFच्या 17 तैनात

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात कोरोना बाधितांचा आकडा 30 हजारांवर पार गेला आहे. त्यामुळे सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आज (17 मे) संपत आहे. उद्यापासून लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू होणार आहे. या टप्प्यात राज्य सरकारने अधिक अटी शिथिल करण्याची तयारी केली आहे. रेड झोन क्षेत्रांमध्ये प्रतिबंधित क्षेत्र जर शासकीय कार्यालय येत असतील तर ते बंद राहतील, अशा स्वरूपाचे आदेश राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांनी काढले आहेत.

लॉकडाऊन 4.0 साठी केंद्राची नियमावली जारी, 31 तारखेपर्यंत या आहेत अटी

संपादन - रेणुका धायबर

First published: May 17, 2020, 9:04 PM IST

ताज्या बातम्या