JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / 5 सेकंदात पत्त्यांसारखी कोसळली 3 मजली इमारत, दुर्घटनेचा LIVE VIDEO

5 सेकंदात पत्त्यांसारखी कोसळली 3 मजली इमारत, दुर्घटनेचा LIVE VIDEO

ही इमारत नेमकी कशामुळे कोसळली याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बंगळुरू, 29 जुलै: मुसळधार पावसानं काहीशी विश्रांती घेतल्यानंतर कर्नाटकातील बंगळुरू इथे मोठी दुर्घटना घडली आहे. निर्माणाधीन इमारतीचं बांधकाम सुरू असलेल्या मागच्या बाजूला तीन मजली इमारत अचानक कोसळून मोठी दुर्घटना घडली. ही धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बांधकाम सुरू असेलेल्या मागच्या बाजूला तीन मजली इमारत कोसळली आहे. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता ही संपूर्ण इमारत एका विशिष्ट अँगलनं खाली कोसळली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये देशातील अनेक भागांमध्ये पावसानं धुमशान सुरू असल्यानं कुठे भूस्खलन तर कुठे इमारत कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं दिसत आहे.

संबंधित बातम्या

हे वाचा- मध्यरात्री रुग्णालयातून येत होता किंचाळण्याचा आवाज, VIDEO VIRAL झाला आणि… मिळालेल्या माहितीनुसार या परिसरात काम सुरू होतं. दरम्यान या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली नाही. आजूबाजूला सुरू असणाऱ्या कामामुळे ही इमारत कोसळली का असा सवालही उपस्थित केला जात आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही इमारत नेमकी कशामुळे कोसळली याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या