नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी : केंद्रीय अर्थसंकल्पात इनकम टॅक्समध्ये (Income Tax Slab Changes)मोठा दिलासा मिळाला आहे. 5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त करण्यात आलं आहे. असा असेल इनकम टॅक्सचा नवा स्लॅब 5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त - 5 लाख रु.ते 7.5 लाख उत्पन्न - 10 टक्के इनकम टॅक्स - 7.5 लाख ते 10 लाख रु. उत्पन्न - 15 टक्के इनकम टॅक्स - 10 ते 12.5 लाख रु. उत्पन्न - 20 टक्के इनकम टॅक्स - 12.5 ते 15 लाख रु. उत्पन्न - 25 टक्के इनकम टॅक्स - 15 लाख रु. जास्त उत्पन्न - 30 टक्के
कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात केल्यानंतर पर्सनल इनकम टॅक्समध्ये सवलतीची मागणी जोर धरत होती. अर्थव्यवस्थेमध्ये मागणी आणि पुरवठा वाढवण्यासाठी लोकांची क्रयशक्ती वाढणं गरजेचं होतं. त्यामुळेच ही सवलत देण्यात आली आहे. ============================================================================================