युरोपीयन युनियनचा 'गुगल'ला 34 हजार कोटींचा दंड, अॅंड्रॉईडच्या गैरवापराचा आरोप

युरोपीयन युनियनने गुगलला 34 हजार 308 कोटी रूपयांचा दंड ठोठावला आहे. गुगलने आपली मक्तेदारी स्थापित करण्यासाठी अॅंड्रॉईडचा गैरवापर केल्याचं आढळून आलं आहे.

न्यूयॉर्क,ता.17 जुलै : युरोपीयन युनियनने गुगलला 34 हजार 308 कोटी रूपयांचा दंड ठोठावला आहे. गुगलने आपली मक्तेदारी स्थापित करण्यासाठी अॅंड्रॉईडचा गैरवापर केल्याचं आढळून आलं आहे. जगातल्या 80 टक्के स्मार्ट फोन्सवर फक्त गुगलचं सर्च इंजिन आणि काही अॅप्लिकेशन्स बाय डिफॉल्ट टाकली जातात. हे करण्यासाठी गुगल कंपन्यांवर दबाव आणतं आणि पैसे देते असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यामुळं इतर स्पर्धक कंपन्यांची वाताहात झाली. या कृतीला युरोपीयन युनियनच्या अनेक कंपन्यांनी तीव्र हरकत घेतली होती. मागच्या वर्षीही गुगलला दंड ठोठावण्यात आला होता. त्यापेक्षा हा दंड दुप्पट असून आत्तापर्यंत युरोपीयन युनियने ठोठावलेला सर्वात जास्त दंड आहे.

तर या निर्णयाविरोधात युरोपीयन युनियनच्या कोर्टात दाद मागणार असल्याचं गुगलने म्हटलं आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी एक व्हीडीओ जारी करून आपली भूमिका मांडली आहे. गुगलने आपल्या ग्राहकांना जास्तीत जास्त पर्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यात विविधता होती आणि लोकांना त्याचा फायदाही झाला मात्र या निर्णयामुळे निराशा आणि धक्का बसल्याचं पिचाई यांनी म्हटलं आहे.या निर्णयामुळे अमेरिकेत खळबळ माजली आहे. तर युरोपीयन देशांमधल्या कंपन्यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय.

 

हेही वाचा...

मेट्रो-3 चे काम रात्रीच्या वेळेस नाहीच – हायकोर्ट

 संभाजी भिडेंची स्फोटक मुलाखत, जशी आहे तशी : मनू, डॉ.बाबासाहेब आणि आंबेपुराणावर काय बोलले भिडे गुरूजी?

दूध आंदोलनावर तोडगा कोण काढणार?, गडकरी की फडणवीस ?

..अन्यथा या सरकारला आरबी समुद्रात बुडवू - परळीत मराठा समर्थक आक्रमक

Trending Now