नवी दिल्ली, 21 सप्टेंबर : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष फेडरल रिझर्व बैठकीकडे लागलं आहे. तसंच डॉलरमध्येही मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. अशा परिस्थितीत महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी फेडने घेतलेल्या निर्णयांमुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. याच कारणामुळे सोमवारी अमेरिकेमध्ये स्पॉट सोन्याची किंमत 0.2 टक्क्यांनी वाढून 1,953.37 डॉलर झाली आहे. तर अमेरिकेच्या फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याचे दर 0.1 टक्क्यांनी वधारून ते 1,960.50 डॉलर प्रति औंस झाले आहेत. इतर चलनांच्या तुलनेत डॉलरमध्ये 0.1 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. खरंतर ही इतर देशांचे चलन असलेल्या गुंतवणूकदारांना सोन्यात गुंतवणूक करण्याची चांगली संधी आहे. 24 तासांत तब्बल 87 हजार लोकांना झाला कोरोना, मृत्यूचीही धक्कादायक आकडेवारी समोर अमेरिकेत मदत पॅकेज जाहीर केल्याने वाढू शकतात किंमती फेड रिझर्व्ह कमिटीच्या सदस्य आणि अध्यक्ष जेरोम पावेल यांच्या भाषणावरही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जेरोम पावेल अमेरिकेला आर्थिक प्रोत्साहन देण्यासाठी काय निर्णय घेतात याकडे गुंतवणूकदारांचं लक्ष लागून आहे. आर्थिक प्रोत्साहन जाहीर केले तर ते डॉलरमध्ये घसरण होऊ शकते. गुंतवणूकदारांना सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी कमी किंमती डॉलर सकारात्मक ठरू शकतात. गनिमी कावा पद्धतीनं आंदोलन यशस्वी केल्यानंतर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया कोरोना व्हायरसच्या संकटात जगभरातील सरकारने आणि केंद्रीय बँकांनी मोठ्या पातळीवर मदत पॅकेज देण्याची घोषणा केली आहे. याचा फायदा देशाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी होणार आहे. त्यामुळेच सोन्याच्या भावात किमान 29 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गर्भवती युवा वैद्यकीय अधिकारी महिलेचा मृत्यू, 5 दिवसांआधीच गमावलं होतं बाळ भारतात काय आहेत सोन्या-चांदीचे दर भारतात सोन्याच्या किंमतींविषयी बोलायचं झालं तर मागच्या आठवड्यात दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किंमतींमध्ये 207 रुपये प्रति 10 ग्राम इतकी वाढ झाली होती. त्यानंतर 10 ग्राम सोन्याचा भाव 52,672 रुपयांवर पोहोचला होता. तर चांदीच्या किंमतींमध्ये मागच्या आठवड्यात 251 रुपये प्रति किलो ग्राम वाढ झाली होती. ज्यानंतर चांदीचा नवा भाव 69,841 रुपयांवर पोहोचला होता.