मुंबई, 22 मे : महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यात गुरुवारी श्रीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई श्रीमती प्रतिभा गवळी (45) यांचे कोरोनाशी झुंज देताना दुःखद निधन झाले अशी बातमी आली आणि सगळ्यांनाच धक्का बसला. ठाणे शहर पोलिसांनी याबाबत दु:ख व्यक्त केलं. त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. प्रतिभा गवळी या ठाणे शहरात तैनात होत्या. पहिल्या महिला पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे. आधीच राज्यातील कोरोना योद्धांना कोरोनाची लागण होत असल्याची प्रकरणं समोर येत होती. त्यातच आता कोरोनामुळे त्यांचा मृत्यू होत असल्याने सर्वांमध्ये भीतीचं वातावरण आहे. राज्यात खरंच मंदी आहे का? दारूविक्रीचे आकडे वाचून तुम्ही व्हाल थक्क अशात प्रतिभा गवळी यांचे पती एसआरपीएफ जवान होते. मात्र नक्षलवाद्यांशी लढताना ते शहीद झाले. त्यानंतर 2008 मध्ये त्यांना ठाणे पोलीस दलात अनुकंपा तत्वावर कामावर घेण्यात आलं. प्रतिभा गवळी यांना दोन मुलगे असून एक 24 वर्षांचा आणि दुसरा 20 वर्षांचा आहे, अशी माहिती श्रीनगर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी दिली. RBI गव्हर्नर शक्तिकांत दास LIVE : सर्व प्रकारच्या कर्जावरील EMI होणार स्वस्त त्यामुळे प्रतिभा यांच्या जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. या कोरोनाने महाराष्ट्रात अक्षरश: थैमान घातलं आहेत. या संसर्गाची लागण झाल्यामुळे एकाच दिवशी तीन पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. मृत पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये एक पुणे येथील तर दोन मुंबईतील आहेत. देशात कोरोनाने रेकॉर्ड तोडला, 24 तासांत 6088 नव्या रुग्णांची नोंद