JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / अमेरिकेत मृत्यूचा तांडव! कोरोनामुळे 50000 हून अधिक रुग्णांचा मृत्यू, 15000 अत्यंत गंभीर

अमेरिकेत मृत्यूचा तांडव! कोरोनामुळे 50000 हून अधिक रुग्णांचा मृत्यू, 15000 अत्यंत गंभीर

अमेरिकेनंतर इटलीमध्ये सर्वाधित कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

जाहिरात

अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स यूनिवर्सिटीच्या विज्ञान आणि इंजीनियरिंग केंद्राकडून (सीएसएसई) जारी केलेल्या संख्येनुसार अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत 5521303 लोकांना संसर्ग झाला असून 175350 जणांचा मृत्यू झाला आहे. ब्राजीलमध्ये आतापर्यंत 3532330 लाख लोगांना याची लागण झाली असून 113318 लोकांचा मृत्यू झाला आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन, 24 एप्रिल : जगभरातील कोरोनाच्या (Coronavirus) संसर्गाची सर्वाधिक संख्या ही एकट्या अमेरिकेत आहे. काही दिवसांपासून येथील रुग्णसंख्या हळूहळू कमी होत असल्याचे दिसत आहे. मात्र या जीवघेण्याता आजाराने अमेरिकेतील (America) तब्बल 50000 जणांचा बळी घेतला आहे. हा आकडा खूप मोठा आहे. अमेरिकेत सध्या संसर्ग झालेल्यांचा आकडा 8,80,000 हून वाढला आहे. सकारात्मक बाब म्हणजे येथे 86000 लोक बरे होऊन घरी परतले आहेत. याशिवाय येथील 750000 हून अधिक Active cases असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. एकूण Active cases मधील 15000 रुग्णांची प्रकृती गंभीर असून त्यांना व्हेटिंलेटर वा आयसीयूत ठेवण्यात आले आहे. जगात कोरोनाचा कहर सुरूच जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातर्फे जारी केलेल्या नव्या आकड्यांनुसार जगभरातील संसर्गांची संख्या वाढून 2709408 पर्यंत पोहोचली आहे. तर मृतांची संख्या 19000 हून जास्त झाली आहे. इटली जगातील दुसरा सर्वात प्रभावित देश असून येथे मृत्यूंची संख्या 25,549 इतकी झाली आहे. येथे संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 189973 पर्यंत पोहोचली आहे. स्पेनमध्ये मृतांची संख्या 22157 आणि फ्रान्समध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 21856 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेकडून चीनवर आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कोरोनाच्या वाढत्या संसर्गासाठी चीनला जबाबदार ठरवत आहेत. गुरुवारी पत्रकार परिषदेत त्यांनी कोरोनाच्या माध्यमातून अमेरिकेवर हल्ला केल्याचे ते म्हणाले. ट्रम्पच नाही तर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ यांनीही आरोप केला आहे. ते म्हणाले, ‘नोव्हेंबरपासून चीनला कोरोना विषाणूबद्दल माहिती होती. यामुळे पुन्हा एकदा ही बाब दृढ झाली आहे की व्हायरस विषयी माहिती देण्यास चीन पारदर्शक नव्हता.’ संबंधित - वर्दीसह आईचंही कर्तव्य बजावतेय कोरोना योद्धा, बाळाला कडेवर घेऊन करतेय ड्यूटी कोरोनाशी कसा लढणार पाकिस्तान? बेड नसल्याने जमिनीवरच सुरू आहेत रुग्णांवर उपचार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या