मुंबई, 12 मे : मागच्या महिन्यात कॅन्सरमुळे दोन महान कलाकार गमाल्यानंतर आता आणखी एका अभिनेत्याचं कॅन्सरमुळे निधन झालं आहे. लोकप्रिय टीव्ही शो क्राइम पेट्रोलचे अभिनेता शफीक अन्सारी यांचं निधन झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार मागच्या काही काळापासून शफीक यांना कॅन्सर होता. टीव्ही जगतातली प्रसिद्ध सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन यांनी याबाबतची माहिती ट्वीटरवरून दिली. 10 मे ला शफीक यांनी अखेरचा श्वास घेतला. CINTAA अभिनेत्याच्या निधनावर आपल्या भावना व्यक्त केल्या. 2008 पासून शफीक अन्सारी या असोसिएशनचे सदस्य होते. टेली चक्करनं दिलेल्या वृत्तानुसार शफीक यांचं निधन स्टमक कॅन्सरमुळे झाला. मागच्या बऱ्याच काळापासून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
शफीक अन्सारी क्राइम पेट्रोलमध्ये प्रमुख भूमिका साकारत होते. याशिवाय ते या शोचे असिस्टंट डायरेक्टर आणि रायटर सुद्धा होते. तसेच त्यांनी 2003 साली आलेला सुपरहिट सिनेमा ‘बागबान’साठी स्क्रिन रायटिंग केली होती. या सिनेमात हेमा मालिनी आणि अमिताभ बच्चन यांच्या मुख्य भूमिका होत्या. एप्रिल महिन्याच्या अखेरीस बॉलिवूडनं कॅन्सरमुळेच दोन कलाकार गमावले आहेत. 29 एप्रिलला अभिनेता इरफानंचं न्यूरोएंडोक्राइन या कॅन्सरमुळे निधन झालं. तर त्याच्याच दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ अभिनेता ऋषी कपूर यांचं निधन झालं होतं. ऋषी कपूर सुद्धा मागच्या दोन वर्षांपासून कॅन्सरशी झुंज देत होते. महाराष्ट्रातील हे गाव आता ‘हिरोची वाडी’, इरफानच्या प्रेमाखातर गावकऱ्यांचा निर्णय VIDEO: कोरोनाविरोधात 9 देशातील 17 कलाकार एकत्र, भारतीय संगीतातून शांतीचा संदेश