पुणे, 05 एप्रिल : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण असून मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या लक्षणीय आहे. पुणे शहरात वाढता आकडा पाहता कोरोनाची साथही तिसऱ्या स्टेजच्या उंबरठ्यावर येऊन धडकली आहे. शनिवारी पुण्यात कोरोनाचा तिसरा बळी गेला. ससून रुग्णालयामध्ये कोरोनाबाधित संशयित महिलेचा मृत्यू झाला होता. परंतु, या महिलेचा रिपोर्ट हाती आला नव्हता. त्यामुळे ही महिला कोरोनाबाधित होती की नाही हे स्पष्ट झाले नव्हते. परंतु, आज या मयत झालेल्या महिलेचा रिपोर्ट आला असून तो पॉझिटिव्ह आढळला आहे. हेही वाचा - संशोधकांना कोरोनावर औषध सापडलं! उपलब्ध असलेल्या मेडिसीनने 48 तासात मारला व्हायरस या महिलेला श्वसनाचा ञास होत होता. त्यातच उपचारादरम्यान, या महिलेचा मृत्यू झाला. तर पुण्यात आणखी 2 कोरोना रुग्ण अत्यवस्थ आहे. या रुग्णांच्या प्रकृतीत सुधार आणण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहे. हेही वाचा - धक्कादायक, डोंबिवलीच्या रुग्णालयातून क्वारंटाइन केलेला रुग्ण पळाला धक्कादायक म्हणजे, पुण्यात जे रुग्ण आढळत आहे, त्यांनी कोणताही परदेश दौरा केले नाही. कोणत्याची प्रवासाची प्रार्श्वभूमी नसलेल्या रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पुण्यात कोरोनाची साथ तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 635 वर दरम्यान, कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत 32 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनाग्रस्तांची संख्या 635 वर पोहोचली आहेत. सर्वात जास्त कोरोनाग्रस्तांची संख्या मुंबई, पुण्यात आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. शुक्रवारी हा आकडा 490 इतका होता. 4 एप्रिलपर्यंत मृतांचा आकडा 32 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासात राज्यात 145 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तब्बल 52 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.