JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / Good News: कोकणात गणेशोत्सवाला जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, एकनाथ शिंदेंनी दिली माहिती

Good News: कोकणात गणेशोत्सवाला जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, एकनाथ शिंदेंनी दिली माहिती

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासाआधी राज्य शासनाच्या नियमांनुसार कोरोनाची चाचणी आणि ई-पास काढणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 ऑगस्ट : गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी परवाणगी मिळाल्यानंतर आता चाकरमान्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सव सुरू होण्याच्या दोन दिवस आधी आणि परतीच्या प्रवासात दोन दिवस टोल मधून मिळणार सवलत मिळणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी आज सांगितलं. यासंदर्भात मंत्री शिंदे, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, कोकण विभागातील पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्तांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती देण्याता आली आहे. टोल सवलतीसाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांनी स्थानिक पोलीस स्थानकात वाहन क्रमांक, वाहन मालकाचे नाव आणि प्रवासाची तारीख नमूद केल्यास त्यांना तात्काळ टोल माफी स्टिकर मिळणार आहे. त्यासाठी नागरीकांनी जवळच्या पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा असं मंत्री शिंदे यांनी सांगितलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासाआधी राज्य शासनाच्या नियमांनुसार कोरोनाची चाचणी आणि ई-पास काढणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीयांना 2021 मध्ये मिळणार ई-पासपोर्ट, वाचा काय असतील फायदे सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांनी समन्वय ठेवून गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या नागरिकांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याच्या सूचना शिंदे यांनी दिल्या आहेत. रिअल हिरो! PPE सूट काढता कित्येक लिटर निघालं घामाचं ‘पाणी’, पाहा VIDEO कोकणवासीयांना 12 ऑगस्टपूर्वी कोकणात पोहचावं लागेल. 12 तारखेला रात्री 12 पर्यंत पोहचतील ते होम क्वारंटाइन होतील. ज्यांना 12 तारखेनंतर जायचं असेल त्यांना 48 तास पूर्वी कोविड 19 चाचणी करावी करावी लागेल ती निगेटीव्ह आली तरच त्यांनी कोकणात जावं असाही नियम करण्यात आला आहे. दरवर्षी मुंबईतून हजारो चाकरमाने गणेशोत्सवासाठी कोकणात जात असतात. मात्र यावेळी कोरोनाचा उद्रेक असल्याने जास्त सतर्कता बाळगण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या