जाहिरात
मराठी बातम्या / Viral / रिअल हिरो! PPE सूट काढता कित्येक लिटर निघालं घामाचं 'पाणी', पाहा VIDEO

रिअल हिरो! PPE सूट काढता कित्येक लिटर निघालं घामाचं 'पाणी', पाहा VIDEO

रिअल हिरो! PPE सूट काढता कित्येक लिटर निघालं घामाचं 'पाणी', पाहा VIDEO

नुसता पीपीई सूट अंगावर चढवल्यानंतर घामाने ओलं होत असतानाही अशा अवस्थेत 12 तास नुसतं उभं राहून हे डॉक्टर रुग्णांसाठी काम करत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

बिजिंग, 13 ऑगस्ट : जगभरात कोरोनाचं थैमान सुरू आहे. कोरोनाच्या काळात सर्वात जास्त स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत आहेत ते डॉक्टर आणि आरोग्य सेवक. जगभरात 2 कोटींहून अधिक कोरोनाच्या रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. 7 लाखहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. या साथीच्या (कोविड -19) दरम्यान डॉक्टर, परिचारिका आणि इतर वैद्यकीय कर्मचारी सतत त्यांच्या जिवावर खेळून लोकांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या या कठोर परिश्रम आणि त्यागाचे वर्णन करणारा असा एक व्हिडीओ आजकाल सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. डेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार हा व्हिडीओ चीनमधील कोविड -19 रुग्णालयाचा आहे. जिथे वैद्यकीय कर्मचारी अद्याप रात्रंदिवस रुग्णांवर उपचार करत आहेत. व्हिडीओमध्ये आपली शिफ्ट संपल्यानंतर, एक डॉक्टर आपला PPE कीट काढतो ज्यातून घामाच्या अक्षरश: धारा वाहिल्याचं दिसतंय.

जाहिरात

हे वाचा- मृत्यूच्या दारातून 3 महिलांनी मुलांना वाचवलं, जीव वाचवण्यासाठी सोडल्या साड्या कोरोनाच्या काळात डॉक्टरला रिअल हिरो असंही म्हटलं जात आहे. नुसता पीपीई सूट अंगावर चढवल्यानंतर घामाने ओलं होत असतानाही अशा अवस्थेत 12 तास नुसतं उभं राहून हे डॉक्टर रुग्णांसाठी काम करताना दिसत आहेत. पीपीई सूट घातल्यानंतर कित्येक तास ते काही खाऊ पिऊ शकत नाहीत. 12 तास सलग काम केल्यानंतर त्यांची अवस्था काय होते हे सांगणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. कोरोनाच्या काळात आपला जीन धोक्यात घालून रुग्णांसाठी रात्रंदिवस झटणाऱ्या या डॉक्टरांना खरंच सॅल्युट. अहोरात्र या पीपीई सूटमध्ये घामाच्या धारा वाहात असतानाही 12 ते 72 तास जवळपास सलग रुग्णांसाठी काम करत असतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात