मुंबई, 27 मार्च : कोरोना व्हायरसची भीती देशभरातील लोकांच्या मनात दिवसेंदिवस वाढत असताना आशेचा किरण फक्त डॉक्टरांकडून मिळत आहे. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा डॉक्टरांकडे लागल्या आहेत. देशभरात 700 हून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर आतापर्यंत 17 लोकांचा मृत्यू झाला आहे. लोकांच्या मनामध्ये वाढत असलेली भीती घालवण्यासाठी डॉक्टरांच्या टीमने एक गाण गायलं आहे. हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आम्ही असताना आपल्याला काहीही होणार नाही हा विश्वास डॉक्टर देत असल्याचं राजस्थानच्या भिलवाडा परिसरात पाहायला मिळाले. महाराष्ट्रातून 135 तर राजस्थानमध्ये कोरोनाचे जास्त रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत भिलवाडा येथून 18 केसेस समोर आल्या आहेत. 24 लाख लोकांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले गेले आहे. भिलवाराच्या डॉक्टरांनी कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी गाण्यातून लोकांना प्रोत्साहन आणि विश्वास दिला आहे. 1961 सालचं प्रसिद्ध असलेल्या गाण्यावर डॉक्टरांनी मिळून एक व्हिडिओ तयार केला आहे. ‘काल के बात है पुरानी…हम हिंदुस्तानी हम हिंदुस्तानी…’ हे गाण या व्हिडीओमध्ये गात असल्याचं दिसून येत आहे. हे वाचा- फिरायला गेले आणि अडकून बसले; पैसेही संपत आले, महिला पर्यटकांना कोसळलं रडू
डॉक्टरांच्या या स्पीरिटला सोशल मीडियावर तुफान लाईक मिळालं आहे. 11 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. 3 हजार लोकांनी हा व्हिडीओ रिट्वीट केला आहे तर 300 हून अधिक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. युझर्सनी डॉक्टरांचे खूप कौतुक केलं आहे. एका युझरने लिहिले, “सर, तुम्ही खूप परिश्रम घेत आहात. आपल्या धाडसाला सलाम, तर दुसऱ्या युझरने लिहिलं आहे, लवकरच कोरोनाव्हायरसला भारत सोडून पळावे लागेल आपली मेहनत आणि आपण करत असलेलं अहोरात्र काम यामुळे कोरोनाला भारत सोडावा लागेल. हे वाचा- VIDEO: ‘तुम्ही लकी विनर आहात’ पोलिसांनी चक्क आरती करून बाहेर हिंडणाऱ्यांना धुतलं