नवी दिल्ली, 13 सप्टेंबर : कॉंग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी कॉंग्रेस कार्यकारी समितीची (CWC) पुनर्रचना केली आहे. यावेळी संघटनेत अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर पक्षाविरोधात आवाज उठवणाऱ्या अनेक नेत्यांना बाजूला करण्यात आलं असल्याचं दिसतं. या पक्षीय रणनीतीमुळे काँग्रेसमधील नेत्यांची नाराजी आणखी वाढण्याची चिन्ह आहेत. ज्या 23 नेत्यांनी सोनिया गांधी यांना पक्षातील बदलांसंबधी पत्र लिहिलं होतं ते नेते संतापले असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पक्षाविरोधात हे नेते काय पाऊलं उचलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सध्याच्या बदलांमुळे नेत्यांमध्ये नाराजी हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, बैठकीतील नाराज नेत्यांनी असं सांगितलं की, 7 ऑगस्ट रोजी लिहलेल्या पत्रात बदलासंबंधी मागणी केली होती. त्याकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष करण्यात आलं. पत्र लिहिणाऱ्या 23 नेत्यांपैकी 18 नेते शनिवारी झालेल्या बैठकीत उपस्थित असल्याचं सांगतिलं जात आहे. यावेळी काही नवीन चेहऱ्यांनादेखील बोलावण्यात आलं होतं. त्यामुळे इतर नेते संतापले असल्याची माहिती समोर येत आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार, या नवीन नेत्यांची नावं ही योग्य वेळी जाहीर केली जातील असं सांगण्यात आलं आहे. संघटनेत बदल झाल्यावर लगेचच कपिल सिब्बल यांनी ट्विट करून आपली नाराजी व्यक्त केली आहे. ‘कंगनाला विरोध म्हणजे डाल में कुछ काला है’, चंद्रकांत पाटलांची घणाघाती टीका पावसाळी अधिवेशनानंतर उठू शकतो मुद्दा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षात गेल्या अनेक दिवसांपासून नाराजी सत्र सुरू आहे. त्यात आता झालेल्या बदलांमुळे आणखी संताप वाढला आहे. अशात हे नेते काही दिवसच शातं राहू शकतात. संसदेच्या पावसाळी अधिवेशनानंतर, जेव्हा आरोग्याची तपासणी करुन सोनिया गांधी परत येतील तेव्हा या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर या 11 गोष्टींची काळजी घ्या, आयुष मंत्रालयाची सूचना राहुल गांधींच्या जवळच्यांना संधी नुकत्याच करण्यात आलेल्या नवीन CWCमध्ये राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या नजिकच्यांना संधी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे अनेक ज्येष्ठ नेते संघटनेत परत आले आहेत. राहुल गांधींच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या आणि बड्या नेत्यांना महत्त्वाच्या भूमिका देण्यात आली आहे. म्हणजे पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांना सरचिटणीस, कर्नाटकचे प्रभारी आणि सोनिया गांधी यांना पाठिंबा देण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या विशेष समितीचे सदस्य केले गेले आहे.