नवी दिल्ली, 1 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत अभियान सुरू झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने (Bharatiya Janta Party) महाराष्ट्रात महिलांना स्वावलंबी करण्यासाठी नवीन उपक्रम सुरू केला आहे. महिला स्वावलंबी होण्यासाठी ‘महिला आत्मानिर्भर योजना’ सुरू केली. महिला स्वावलंबी कर्ज सहाय्य योजनेद्वारे महिलांना 10000 रुपयांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे. तीन महिन्यांपर्यंत पैसे द्यावे लागणार नाही बँकेने दिलेल्या या कर्जाच्या 8 टक्के व्याजापैकी 4 टक्के विविध स्वयंसेवी संस्थांकडून भरले जातील. एवढेच नाही तर या योजनेत 3 महिन्यांपर्यंत कोणालाही पैसे द्यावे लागणार नाहीत. 3 महिन्यांनंतर 1००० रुपयांपेक्षा कमी रक्कम हप्त्याने ईएमआय परत करावे लागतील. नानाजी देशमुख फाउंडेशन आणि रवींद्र जोशी मेडिकल फाउंडेशनतर्फे ही योजना सुरू करण्यात आली आहे. नानाजी देशमुख प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पांडे म्हणाले की, या योजनेद्वारे जे कुटुंब रोजंदारीवर काम करतात त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. यामध्ये फक्त 888 रुपयांचा हप्ता पडेल. या योजनेची सुरुवात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांनी स्वयंसेवी संस्थांना पुढे येऊन लोकांना स्वावलंबी होण्यास मदत करण्याचे आवाहन केले. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर जनतेला स्वावलंबी करण्यासाठी भाजप विविध माध्यमातून लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे. या मालिकेत ही नवी योजना महाराष्ट्रात सुरू झाली आहे. हे वाचा- आर्मी कँटीनमध्ये स्वदेशीचा डंका; परदेशी सामानांविरोधातही हल्लाबोल VIDEO: COVID 19 रुग्णांसाठी 1000 बेडच्या हॉस्पिटलची उभारणी पाहून व्हाल थक्क