JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / Alia Bhatt mimicry artist : रणबीरच्या बायकोवर भारी पडतेय 'ही' Influencer; खऱ्या आलियापेक्षा चाहत्यांना पडली या तरुणीची भुरळ

Alia Bhatt mimicry artist : रणबीरच्या बायकोवर भारी पडतेय 'ही' Influencer; खऱ्या आलियापेक्षा चाहत्यांना पडली या तरुणीची भुरळ

खऱ्या आलिया भट्टला (Alia Bhatt mimicry wedding speech) तर पसंत केलं असेल पण या तिच्याहून सरस ठरणाऱ्या डुप्लिकेट आलियाला पाहून आश्चर्याचा धक्का बसेल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 12 जुलै: आलिया भट्ट (Alia Bhatt) या अभिनेत्रीने कॉफी विथ करणच्या (Koffee With Karan wedding speech alia bhatt) मंचावर हजेरी लावल्यापासून तिची बरीच चर्चा होताना दिसत आहे. या शोमध्ये आलियाने अनेक गोष्टींबद्दल खुलासा केला होता ज्याने तिचं खाजगी आयुष्य विशेषतः तिचं लव्ह लाईफ खूप चर्चेत आल्याचं पाहायला मिळालं. पण आलियाला आता टफ फाईट द्यायला तिच्यासारखी नक्कल करू शकणारी एक influencer सध्या बरीच चर्चेत येत आहे. आलिया भट (Alia Bhatt mimicry) सारखा हुबेहूब अभिनय करू शकणारी आणि काहीशी तिच्यासारखी दिसणारी चांदनी (Chandani mimic) नावाची एक influencer सध्या खूप गाजताना दिसत आहे. चांदनीने याआधी सुद्धा आलियाच्या आवाजात अनेक रील्स शेअर केले आहेत पण तिच्या रिसेन्ट रीलमुळे तिला तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या रिलमध्ये तिने आलिया भटने कॉफी विथ करणच्या शेवटी आपल्या लग्नाबद्दल जे सांगितलं त्याची हुबेहूब तिच्याच आवाजात नक्कल केली आहे. तिला या व्हिडिओवर खूप प्रेम आणि शुभेच्छा मिळताना दिसत आहेत. अनेकांनी कमेंट्सचा पाऊस पाडत ‘परफेक्ट, डिट्टो आलिया’ अशा अर्थाच्या बऱ्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलं आहे, “अरे तू तर आलियापेक्षा ही जास्त आलिया सारखा आवाज काढतेस” तर एकाने तिच्या हसण्याच्या मिमिक्रीचं कौतुक केलं आहे. चांदनी आलिया वट्ट अशा नावाने आलिया भट ची मिमिक्री करत असते. कॉफी विथ करणच्या शेवटच्या सेगमेंटमध्ये आलियाला स्वतःच्या लग्नाबद्दल करणने 30 सेकंद बोलायला सांगितलं होतं. ‘माझ्या लग्नाबद्दल बोल’ असं करण म्हणल्यावर आलियाने शक्कल लढवत स्वतःच्या लग्नाऐवजी करणचं लग्न कसं असेल यावर बोलायला सुरुवात केली आणि एकच हशा पिकला. हे ही वाचा-  Vir Das controversy: कॉमेडियन वीर दासचा नवा VIDEO चर्चेत; पुन्हा उडवली भारताची खिल्ली, नेटकऱ्यांचा संताप तेव्हा झालेल्या हास्यस्फोटाचं या influencer ने हुबेहूब वर्णन केलं आहे. आलिया या सेगमेंटमध्ये ज्या पद्धतीने हस्ते, बोलते सगळे हावभाव चांदनीने नेमके टिपल्याचं कळत आहे.

चांदनी याव्यतिरिक्त अनेक भूमिका करताना दिसते. तिने साकारलेली सिंधी आई सुद्धा चाहत्यांना खूप आवडते. तसंच चांदनी सुप्रिसद्ध शो तारक मेहता का उल्टा चष्मा फेम दयाबेनचा सुद्धा हुबेहूब आवाज काढते.

चांदनी सारख्या अनेक influencer अभिनेत्रीची हुबेहूब मिमिक्री करण्यासाठी ओळखल्या जातात ज्यांना हजारो, लाखोंमध्ये फॉलोअर्स आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या