छत्तीगड, 05 सप्टेंबर : शनिवारी पहाटे एका भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये मजुरांना घेऊन जाणाऱ्या बसची एका ट्रकला धडक बसली आहे. या भीषण अपघातामध्ये 7 मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. गंजम येथून मजुरांसह गुजरातकडे बस निघाली होती होती. ओडिशाच्या गंजमहून गुजरातच्या सूरत इथे मजुरांना घेऊन जाणारी बसची ट्रकला धडक बसली आहे. त्यात सात जण ठार तर सात जण जखमी झाले आहेत. रायपूरचे एसएसपी अजय यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे जेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांची ओळख अद्याप पटलेली नसून घटनास्थळी पोलीस दल उपस्थित असल्याची माहिती देण्यात आली आहे. कोरोना लसीसाठी आला नवा Covax प्लॅन, 18 सप्टेंबर ही नोंदणीची शेवटची तारीख
दरम्यान, बस दुर्घटनेत मृत्यू झालेल्या 7 जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये अनुदान देण्याची घोषणा ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी केली आहे. तर जखमींना तातडीने मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चिनी सैनिकांनी अरुणाचलमधल्या 5 जणांचं केलं अपहरण, काँग्रेस MLA चा धक्कादायक दावा अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी घटनास्थळावरून 7 जणांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.