कानपूर, 17 मे : कोरोनामुळे अनेकांचे जीव गेले पण लॉकडाऊनमुळेही अनेकांवर जीव गमावण्याची वेळ आली. लॉकडाऊनमुळे अडकेलेले अनेक कुटुंब आता पायी आपल्या घरी चालले आहेत. अशात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील 3 लोक मुंबई इथून बहराइचला जात होते. पण त्यांच्यावर भयानक प्रसंग ओढावला ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईवरून निघाल्यानंतर ट्रक चालकानं कुटुंबाला वाटेवर सोडलं. अशा परिस्थितीत कुटुंबीय बहराइचला पायी जायला निघाले. हे कुटुंब कानपूर जिल्ह्यात दाखल होताच त्यातील एक 15 वर्षीय किशोर अचानक जमिनीवर पडला. मिळालेल्या माहितीनुसार, उच्च तापामुळे तरूणाला चक्कर आली होती. यानंतर तो जमिनीवर पडला. अजन्वी शहरात पोलिसांकडून मदतीची अपेक्षा होती पण त्यांनी काहीच मदत केली नाही. अशा परिस्थितीत त्याचं कुटुंब जवळच्या हॉस्पिटलच्या दिशेनं निघालं पण किशोरला रुग्णालयाबाहेर रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. मग काही काळानंतर त्याचा मृत्यू झाला. ही घटना दुपारी अडीच वाजताची आहे. BREAKING:माओवाद्यांच्या हल्ल्यात पोलिस उपनिरीक्षकासह एक कॉन्स्टेबल शहीद कुटुंबियांच्या मदतीसाठी कोणीही नाही आलं असं म्हटलं जात आहे की, कोरोनाच्या भीतीमुळे कोणताही पोलीस कर्मचारी त्या कुटुंबाकडे मदतीसाठी गेला नाही. जर त्याला योग्य वेळी प्रथमोपचार मिळाले असते तर कदाचित त्याचा जीव वाचू शकला असता. खरंतर मृत युवकाचा मृतदेह बराच काळ चाकेरी राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला ग्रीन बेल्टमध्ये पडला होता. मृताचे कुटुंबीय बराच काळ शरीराजवळ बसले होते, परंतु तोपर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याने या पीडितांची काळजी घेतली नाही. पण नंतर पोलीस व प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व पुढील कार्यवाही सुरू केली. आता अशा परिस्थितीत सर्वांत मोठा प्रश्न असा आहे की या निष्काळजीपणाला दोषी कोण? सलमानच्या नावानं फसवणूक करत होती महिला, अभिनेत्यानं केला पर्दाफाश अधिकाऱ्यांना दिल्या कठोर आदेश एकीकडे राज्य प्रमुख योगी आदित्यनाथ यांनी सर्व जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत की, कामगार राष्ट्रीय महामार्गावर चालू नयेत. जर ते चालताना दिसले तर तात्काळ त्यांच्या भोजन आणि पाण्याची ताबडतोब व्यवस्था करुन त्यांना इच्छितस्थळी पाठवण्याची व्यवस्था केली पाहिजे, परंतु कानपूर पोलिसांवर त्याचा काही परिणाम होताना दिसत नाही. 8 दिवसांच्या उपचारानंतरही माजी मुख्यमंत्र्यांची प्रकृती गंभीर. डॉक्टरांची माहिती संपादन - रेणुका धायबर