JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / चाचणी न घेता 9 जणांचे रिपोर्ट कोरोना प़ॉझिटिव्ह; प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड

चाचणी न घेता 9 जणांचे रिपोर्ट कोरोना प़ॉझिटिव्ह; प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड

मुंबईहून परतत असताना रस्त्यात या गावातील मजुराचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भदोही, 26 मे : देशभरात कोरोनाचा (Coronavirus) कहर आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. उत्तर प्रदेशातही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ होत आहे. उत्तर प्रदेशात 6532 हून अधिक कोरोनाबाधित आहेत. अशात उत्तर प्रदेशात भदोही जिल्ह्यात कोरोना टेस्टिंगबाबत निष्काळजीपणा समोर आला आहे. येथे सॅम्पल न घेताही 9 जणांना कोरोना पॉझिटिव्ह घोषित करण्यात आले आहे. मुंबईहून घरी येताना कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू रिपोर्टनुसार भदोही जनरदमधील सरपतहा गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला. यानंतर गेल्या रविवारी गावात 9 लोकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यानंतर गावात गोंधळ उडाला. गावकऱ्यांनी आरोप केला आहे की त्यांचे सॅम्पल घेण्यात आले नाही आणि तरीही त्यांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले आहे. गावकऱ्यांचा विरोध आणि मीडियात आलेल्या बातम्यांनतर सोमवारी प्रशासनाने अपडेटेड लिस्ट जारी केली आणि आपली चूक सुधारली. सरपतहा गावातील एका रहिवाशाचा 17 मेच्या रात्री मुंबईहून घरी येत असताना मिर्जापूर येथे मृत्यू झाला. त्यानंतर मृतकचे कुटुंबीय खासगी वाहनाने त्यांचे शव घेऊन आले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येत होते तेव्हा पोलिसांनी लोकांना अडवले व मृतदेहाचा कोरोना सॅम्पल घेतल्यानंतर अंत्यसंस्कार करू दिले. जेव्हा 21 मे रोजी मृतकचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यानंतर प्रशासनाने गावाला हॉटस्पॉट घोषित केले. त्यानंतर मात्र आरोग्य विभागाने अंत्यसंस्कारात सहभागी झालेल्यांचं सॅम्पल घेतलं नाही आणि रविवारी आलेल्या रिपोर्टमध्ये या गावातील 9 जण कोरोना बाधित असल्याचे सांगितले. हे वाचा - प्रेयसीसोबत दोन दिवस जरी एकत्र राहिलात तरी लिव्ह इन : पंजाब आणि हरियाणा हायकोर्ट

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या