02 मार्च : शरद पवार हे दोन दगडांवर पाय ठेवणारे राजकारणी आहेत अशी टीका शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. स्वातंत्र्यसैनिकांना आज बेस्ट बसच्या पासचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
पवारांना लोकसभेची निवडणूक लढवायची नाही कारण क्रिकेटमधला पैसा डोळे दिपवणारा आहे. विंदू दारासिंग यानी मॅच फिक्सींग बद्दल केलेल्या आरोपांची चौकशी झालीच पाहिजे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पवारांना लक्ष केलं आहे.