बँकिंग क्षेत्रात अल्पावधीतच नाव कमावलेल्या रत्नाकर बँक सामान्य लोकांना एफडीवर 8 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 8.50 टक्के दराने व्याज देत आहे.
मुंबई, 07 मार्च : आरबीआयने येस बँकेवर गुरुवारी निर्बंध घातले आहेत. येस बँकेच्या खातेदारांना 5 मार्च ते 6 एप्रिलदरम्यान बँकेतून फक्त 50 हजार रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. 50 हजारांहून अधिकची रक्कम काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेची परवानगी घ्यावी लागणार आहे. येस बँकेवर सरकारने केलेल्या कारवाईमुळे येस बँकेच्या खातेदारांवर मोठं आर्थिक संकट ओढवलं आहे. वाढत्या कर्जाच्या बोज्यामुळे येस बँक अडचणीत आली आहे. रिझर्व्ह बँकेने हे निर्बंध लादण्याआधी गुजरातच्या वडोदरा स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीनं तब्बल 265 कोटींची रक्कम काढून घेतल्याची बाब समोर आली आहे. या कंपनीने आपली सर्व रक्कम दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर केली आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रिझर्व्ह बँकेकडून हे निर्बंध लावल्याचं सांगितलं जात आहे. सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेतून मिळालेली रक्क येस बँकेत जमा करण्यात आली होती. मात्र आरबीआयने निर्बंध लावण्याआधीच या बँकेतील पैसे दुसऱ्या बँकेत वळवण्यात आले आहेत. इतकच नाही तर सरकारी योजनेतू येणारा पैसा आणि बँकेतील ठेवी ग्राहकांना कसे देणार हा प्रश्न बँकेसमोर असल्यानं बँक अडचणीत सापडली आहे. हे वाचा- तुम्हालाही येतो का फोन केल्यावर खोकल्याचा आवाज? काय आहे त्यामागचं कारण मार्च 2019 मध्ये येस बँकेवर RBIनं एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. सप्टेंबर 2019 पासून सिक्युरिटी अॅण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI)या प्रकरणी चौकशी करत आहे. गेल्या वर्षी मे आणि जून महिन्यातही येस बँकेला दंड ठोठावण्यात आला होता. सप्टेंबर 2019 मध्ये येस बँकेचे माजी प्रवर्तकांची संपूर्ण भागिदारी विकली होती. दरम्यान, बँकेची तरलता राखण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात आली होती. मात्र, याचा काही लाभ होऊ शकला नाही. त्यामुळे नोव्हेंबर 2019 मध्ये हे लक्षात आलं होतं की येस बँकेला कुठूनही पैसा मिळू शकणार नाही, असेही सीतारामण यांनी यावेळी सांगितलं. सन 2014 च्या आधीपासूनच येस बँकेचा कारभार दबावाखाली होता. यामध्ये एस्सेल ग्रुप, डीएचएफएल, आयएलअँण्डएफएस आणि व्होडाफोन सारख्या कॉर्पोरेट कंपन्यांचा समावेश आहे. आम्ही ठेवीदारांच्या पैशांवर कोणताही परिणाम होणार नाही. तो सुरक्षित असल्याची ग्वाही निर्मला सीतारणम यांनी दिली. हे वाचा- ‘तो’ पुन्हा येतो आहे! मुंबईसह ठाणे, पालघर, रायगडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता