JOIN US
मराठी बातम्या / देश / सरकारच्या निर्णयावर महिला झाल्या आक्रमक; भाजी बाजार 3 तास आणि दारुची दुकाने 7 तास खुली

सरकारच्या निर्णयावर महिला झाल्या आक्रमक; भाजी बाजार 3 तास आणि दारुची दुकाने 7 तास खुली

विविध राज्यांमध्ये दारुची दुकाने सुरू करण्यात आली असून किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

विशाखापट्टनम, 5 मे : देशभरात कोरोनाचा (Coronavirus) कहर वाढत असल्याने लॉकडाऊन (Lockdown) वाढविण्यात आला आहे. 17 मेपर्यंत हा लॉकडाऊन असेल. यापुढे हळूहळू सर्व सेवा सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असेल. दरम्यान देशातील अनेक राज्यांमध्ये दारुची दुकाने सुरू करण्यात आली आहे. सध्या अर्थव्यवस्थेचा विचार करता होणारी तूट भरून काढण्यासाठी दारूची विक्री केली जात असून यावर अतिरिक्त रक्कम आकारली जात आहे. मात्र अनेक सामाजिक संस्थांनी दारुची दुकाने खुली करण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. आंध्रप्रदेशमधील विशाखापट्टणम येथील महिलांनी दारुची दुकाने सुरू करण्यावरुन विरोध प्रदर्शन केलं आहे. यापैकी एक महिला म्हणाली की, ‘भाजी बाजार केवळ 3 तास सुरू असतात. मात्र दारुची दुकाने 7 तास सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.’

यावर महिलांनी राग व्यक्त केला आहे. दारू विक्री बंद असल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र सरकारच्या निर्णयानंतर दारुची दुकाने खुली करण्यास परवानगी देण्यात आली. यामुळे महिलांना होणारा त्रास अधिक वाढेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. संबंधित - भयंकर! कैद्याने गुप्तांग कापून मंदिरात केलं अर्पण; कारण ऐकून पोलिसही झाले हैराण अहवालातून आलं अमेरिकेतील धक्कादायक वास्तव, एका दिवसात 3000 कोरोना बळींची शक्यता

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या