JOIN US
मराठी बातम्या / देश / जिवंत नवऱ्याचं बनवल मृत्यूपत्र, महिलेने अशाप्रकारे गंडवल सरकारला

जिवंत नवऱ्याचं बनवल मृत्यूपत्र, महिलेने अशाप्रकारे गंडवल सरकारला

उत्तरप्रदेशमध्ये एका महिलेने पतीचा खोटा मृत्यू दाखला बनवून सरकारकडून विधवा योजनेचे पैसे लाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

जाहिरात

जिवंत नवऱ्याचं बनवल मृत्यूपत्र, महिलेने अशाप्रकारे गंडवल सरकारला

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अमेठी, 1 जुलै : उत्तरप्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेठी येथील एक महिला तिच्या पतीचा खोटा मृत्यूपत्रचा दाखल बनवून सरकारकडून विधवा पेंशनचा लाभ घेत होती. पत्नीने सरकारकडून तब्बल तीन वर्ष विधवा म्हणून पैसे घेतले असून आता या घोटाळ्याबाबत माहिती मिळाल्यावर तिच्याकडून या पैशांची रिकव्हरी केली जाण्याची शक्यता आहे. अमेठी जिल्ह्यातील सराय खेमा गावातील गुडिया नावाच्या मुलीचे लग्न 2004 मध्ये महोना पश्चिम गावातील रहिवासी असलेल्या राम हरक याच्याशी झाले होते. परंतु 2015 मध्ये दोघांमध्ये वाद झाला, त्यानंतर गुडिया पतीपासून विभक्त झाली. यानंतर 2019 मध्ये तिने पतीचे बनावट मृत्यू प्रमाणपत्र बनवले. त्यानंतर ती तीन वर्षे विधवा म्हणून पेंशन घेत होती.

गुडिया ही सरकारची फसवणूक करत असल्याची माहिती तिच्या पतीला कळताच त्याने याची तक्रार विभागीय अधिकाऱ्यांकडे केली. जिल्ह्या प्रोबेशन अधिकारीने या संपूर्ण घटनेबद्दल चौकशी करणार असल्याचे म्हंटले आहे. चौकशीचा अहवाल आल्यानंतर महिलेवर कारवाई केली जाईल तसेच तिला मिळालेल्या पेंशनची रिकव्हरी केली जाईल असे म्हंटले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या