JOIN US
मराठी बातम्या / देश / जुलैमधील JEE आणि NEET च्या परीक्षा रद्द होणार? HRD मंत्र्यांनी दिलं उत्तर

जुलैमधील JEE आणि NEET च्या परीक्षा रद्द होणार? HRD मंत्र्यांनी दिलं उत्तर

कोरोनाचा व्हायरसची वाढती संख्या पाहता परीक्षा रद्द करण्याची मागणी केली जात आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 2 जुलै : देशभरात सुरू असलेल्या कोरोनाच्या कहरामुळे सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. त्यात शिक्षण विभागात तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न समोर उभा आहे. अशातच JEE आणि NEET च्या परीक्षा कधी होणार याबाबत विद्यार्थ्यांकडून सातत्याने प्रश्न विचारला जात आहे. अनेक विद्यार्थ्यांनी ट्विटरवरुन जुलैमध्ये घेण्यात येणाऱ्या जेईई आणि नीटच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. याबाबत एचआरडी मंत्री रमेश पोखरियाल यांनी सांगितले की, एनटीए उद्या यासंदर्भातील बाजू मांडणार आहे.

संबंधित बातम्या

हे वाचा- VIDEO : कोरोनामुळे झाला मृत्यू, दफनासाठी 500 मीटर खेचत नेला मृतदेह पोखरियाल गुरुवारी म्हणाले की, एनटीए आणि इतर तज्ज्ञ याबाबत चर्चा करुन उद्या आपली बाजू मांडणार आहेत. जुलै 19 आणि जुलै 23 रोजी जेईई आणि 26 जुलै रोजी नीटची परीक्षा शेड्यूल करण्यात आली आहे. ही परीक्षा देणारे 30 लाख विद्यार्थी सध्या गोंधळलेल्या परिस्थितीत आहे. देशातील कोरोनाचा कहर पाहता परीक्षा ठरवलेल्या तारखेला होणार की नाही याबाबत स्पष्टता नाही. मात्र अद्याप या विषयासंदर्भात नेमका निर्णय घेण्यात आला नसून लवकरच परीक्षांबाबत नेमका निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान देशात कोरोनाबाधितांचा (Coronavirus) आकडा 6 लाखांच्या घरात गेला आहे. तर, देशात आतापर्यंत 89 लाख जणांची चाचणी करण्यात आली आहे. संपादन -मीनल गांगुर्डे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या