कवच टेक्नॉलॉजीने कोरोमंडल ट्रेनचा अपघात रोखला असता का?
बालासोर, 03 जून : ओडिशातील बालासोरमध्ये शुक्रवारी 2 जून रोजी भीषण दुर्घटना घडली. रेल्वेच्या ३ गाड्यांची धडक होऊन घडलेल्या या दुर्घटनेत 288 जणांचा मृत्यू झाला. तर यात 1 हजारहून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमी लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. अपघातातील मृतांच्या वारसांना केंद्र सरकारकडून 10 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. तर गंभीर जखमी असलेल्यांना 2 लाख आणि किरकोळ जखमी झालेल्यांना 50 हजार रुपये दिले जाणार आहेत. पश्चिम बंगालच्या हावडा इथून चेन्नईला जाणारी कोरोमंडल एक्सप्रेस दुपारी साडे तीन वाजता निघाली होती. काही तासांचा प्रवास झाल्यानंतर सातच्या सुमारास कोरोमंडल एक्सप्रेसचा अपघात झाला. बालासोरच्या बहनागा बाजार स्टेशनवर तीन ट्रेनमध्ये ही धडक झाली. या ट्रेन अपघाताच्या चौकशीवेळी एक महत्त्वाची माहिती समोर आलीय. या ट्रेनच्या मार्गावर रेल्वेची नवी टेक्नॉलॉजी कवच याचा प्रयोग केला गेला नव्हता. ही सिस्टिम आल्यानंतर भारतीय रेल्वेचं हे कवच असून यामुळे अपघात टळतील आणि गाडीतून प्रवास करणारे सुरक्षित राहतील असा दावा केला गेला होता. Train Accident : ओडिसा रेल्वे अपघात कसा झाला? 2 ट्रॅक, 3 ट्रेन अन् 5 मिनिटात गेले 288 बळी नॅशनल ऑटोमेटिक ट्रेन प्रोटेक्शन सिस्टिम म्हणून कवच टेक्नॉलॉजीची चर्चा 2020 मध्ये सुरू झाली होती. या कवच टेक्नॉलॉजीला RDSOने तयार केलं होतं. 2022 मध्ये रेल्वेकडून याचा वापरही सुरू केला गेला होता. कवच सिस्टिम आल्यानंतर रेल्वेच्या मार्गावर याला भारताचे कवच म्हटलं जात होतं. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कवच प्रणालीची सुरुवात केली होती. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं होतं की, ही कवच टेक्नॉलॉजी एक एसआयएल 4 प्रमाणित टेक्नॉलॉजी आहे. सुरक्षेचं उच्चस्तरीय असं तंत्रज्ञान आहे. कवच तंत्रज्ञानाचा वापर केल्यानं रेल्वे दुर्घटनेत समोरा समोर ट्रेन धडकण्याच्या घटना कमी म्हणजे जवळपास शून्यच असतील असं म्हटलं जातंय. भारतातच ही सिस्टिम तयार करण्यात आली गेली. याच्या वापरावेळी अनेक ट्रेन रूटवर समोरासमोर ट्रेनच्या दुर्घटना रोखता आल्या. पण रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ओडिशाच्या बालासोर परिसरात याचा वापर केला गेला नव्हता. यामुळे ही दुर्घटना घडली. या सिस्टिमच्या वापरामुळे जेव्हा दोन ट्रेन समोरासमोर येतात तेव्हा कवचमुळे दोन्ही ट्रेनचा वेग आपोआप कमी होतो. हळू हळू इंजिनला ब्रेक लागतो. Coromandel Express : किंग ऑफ साऊथ इस्टर्न रेल्वे, वर्षभर असते फुल्ल; का पडलं कोरोमंडल नाव? रेल्वे मंत्रालयाने कवच टेक्नॉलॉजीची ट्रायल 2022 मध्ये केली होती. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हेसुद्धा त्यावेळी ट्रेनमध्ये होते. यशस्वी चाचणी झाल्यानंतर लिंगमपल्ली-विकाराबाद सेक्शनमध्ये याचा सर्वात आधी वापर केला गेला. यानंतर दिल्ली-मुंबई, दिल्ली-हावडा, स्वर्णिम चतुर्भुज आणि स्वर्ण विकर्ण मार्गावर वापर करण्यात आला. देशभरात ही सिस्टिम लागू कऱण्याची तयारी केली जात आहे. मात्र सर्व रेल्वे मार्गावर सिस्टिम लावण्यासाठी बराच वेळ लागेल. ओडिशातील बालासोर परिसरातील रेल्वे मार्गावर याचा वापर केला असता तर इतकी मोठी रेल्वे दुर्घटना टाळता आली असती. 2022च्या कवच टेक्नॉलॉजीअंतर्गत जवळपास 2 हजार किमी रेल्वे नेटवर्कवर याचा वापर करण्याचं ध्येय ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर 4 ते 5 हजार किमी रेल्वे नेटवर्क जोडण्याचे लक्ष्य होते. भारतीय रेल्वेच्या जवळपास 35 हजार किमी रेल्वे मार्गावर ही सिस्टिम लावण्याचे टार्गेट ठरले आहे.