JOIN US
मराठी बातम्या / देश / लॉकडाऊनमध्ये उडवला लग्नाचा बार; घरी जाण्याऐवजी थेट पोहोचले रुग्णालयात

लॉकडाऊनमध्ये उडवला लग्नाचा बार; घरी जाण्याऐवजी थेट पोहोचले रुग्णालयात

सरकारी रुग्णालयाच्या समोर फुलांनी सजलेली गाडी उभी राहिली. आणि नवरी, नवरदेव गाडीतून खाली उतरले

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हरियाणा, 24 मे : सध्या कोरोनाच्या (Coronavirus) संकटामुळे देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यादरम्यान लग्न आणि इतर कार्यक्रमांवर निर्बंध घातले आहे. काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न लावण्याची परवानही देण्यात आली आहे. येथील नागरिक रुग्णालयात अचानक फुलांनी सजलेली गाडी समोर येऊन थांबली. ते पाहून सर्वजण चकीत झाले. अनेकजण खिडकीतून डोकावून पाहत होते. अशा परिस्थिती कोण रुग्णालयात दाखल झालं असेल याचा सर्वजण विचार करीत होते. या गाडीतून एक नवविवाहीत जोडपं खाली उतरलं. विशेष म्हणजे पंजाबमध्ये लग्न झाल्यानंतर नववधूला घेऊन नवरदेव घरी गेला नाही तर सर्वात पहिल्यांदा कोरोना टेस्ट करण्यासाठी रुग्णालयात पोहोचला. सांगितले जात आहे की, भंगू गावातील तरुणाची पंजाबमधील लंबी गावात लग्न झाले होते. शनिवारी तो जिल्हा प्रशासनाच्या परवानगीने काही मोजक्या वऱ्हाड्यांसह पंजाबला पोहोचला. लग्नानंतर नवरदेव आणि नवरी सिररा पोहोतले. मात्र घरी जाण्यापूर्वी फुलांनी सजलेली गाडी घेऊन ते सरळ सिव्हिल रुग्णालयात पोहोचले. तेथे नवरा व नवरदेव यांची कोरोना चाचणी केली. सीएमओ डॉ. सुरेंद्र नैन यांनी सांगितले की नवरी व नवरदेव लग्नानंतर घरी जाण्यापूर्वी आधी कोरोनाची चाचणी करण्यासाठी रुग्णालयात आले. लोकांनी टेस्ट करुन घेण्यासाठी पुढे यायला हवं असंही ते यावेळी म्हणाले. हे वाचा -  सायननंतर राजावाडी हॉस्पिटलमधील धक्कादायक VIDEO! जनरल वॉर्डमध्ये मृतदेह पडून आठवडाभरात महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढणार, या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या