JOIN US
मराठी बातम्या / देश / ‘हिंदूंवर मुस्लीम भारी पडतील’ असं वक्तव्य करणाऱ्या वारिस पठाण यांना पुन्हा एकदा नोटीस

‘हिंदूंवर मुस्लीम भारी पडतील’ असं वक्तव्य करणाऱ्या वारिस पठाण यांना पुन्हा एकदा नोटीस

वारिस पठाण यांच्या वादग्रस्त विधानावरुन राजकीय पक्षांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बंगळुरु, 5 मार्च : “15 करोड हैं मगर 100 के उपर भारी हैं, ये याद रखना!” असं वादग्रस्त विधान करणारे MIM चे नेते वारिस पठाण यांना कर्नाटकातील कलबुर्गी पोलिसांकडून दुसऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. गुलबर्गा येथील एका सभेत एमआयएमचे वारिस पठाण यांनी एक धक्कादायक विधान केलं होतं. ‘100 कोटी हिंदू जनतेवर 15 कोटी मुस्लीम भारी पडतील. आम्हाला स्वातंत्र्य दिलं जात नसेल तर ते मिळवावं लागले’ असं विधान त्यांनी केलं होतं. या विधानावरुन त्यांना पोलिसांकडून नोटीस जारी करण्यात आली आहे. या प्रकरणात त्यांना पोलिसांनी 29 फेब्रुवारीला हजर राहण्यास संगितले होते. मात्र ते हजर न राहिल्याने पुन्हा एकदा नोटीस बजावण्यात आली आहे. येत्या 8 मार्चपर्यंत पोलीस ठाण्यात येऊन जबाब नोंदवण्याचा आदेश त्यांना देण्यात आला आहे. संबंधित - वारिस पठाण यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून मनसेने मारले जोडे काय म्हणाले होते वारिस पठाण? गुलबर्गा येथील एका सभेत एमआयएमचे वारिस पठाण यांनी एक धक्कादायक विधान केलं होतं. ‘100 कोटी हिंदू जनतेवर 15 कोटी मुस्लीम भारी पडतील. आम्हाला स्वातंत्र्य दिलं जात नसेल तर ते मिळवावं लागले’ असं विधान त्यांनी केलं होतं. यानंतर असदुद्दीन ओवेसी यांनी वारिस पठाण यांच्याविरोधात कारवाई केली. वारिस पठाणला मीडियाशी बोलण्यास मनाई करण्यात आली होती. जोपर्यंत पक्षाकडून परवानगी दिली जात नाही तोपर्यंत मीडियाशी बोलता येणार नसल्याचं ओवेसींनी म्हटलं होतं. वारिस पठाणचा शिरच्छेद करणाऱ्यास 11 लाखांच्या बक्षिसाची घोषणा वादग्रस्त वक्तव्यामुळे देशभरात वारिस पठाण यांच्यावर टीका करण्यात आली होती. हक-ए-हिंदुस्तान मोर्चा या मुस्लीम संघटनेने त्यांच्याविरोधात घोषणा केली होती. वारिस पठाण याचा शिरच्छेद करा, हे करणाऱ्याला 11 लाखांचे बक्षीस देऊ अशी घोषणा या मुस्लीम संघटनेने केली होती. यावेळी मुजफ्फरपूर येथील कंपनी बाग रोडवर मुस्लीम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वारिस पठाण याचा पुतळाही जाळला होता. हक-ए-हिंदुस्तान या संघटनेचे राष्ट्रीय संयोजक तमन्ना हाश्मी यांनी वारीण पठाणला देशद्रोही म्हटलं होतं. संबंधित - वारिसला पठाण यांना ‘15 कोटीं’च वक्तव्य भोवलं, ओवेसींनी केली मोठी कारवाई

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या