वारिस पठाण यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून मनसेने मारले जोडे

वारिस पठाण यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून मनसेने मारले जोडे

हिंदूबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेधार्थ एमआयएमचे वारिस पठाण यांची मनसेतर्फे रविवारी जालन्यात प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.

  • Share this:

जालना,23 फेब्रुवारी:हिंदूबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेधार्थ एमआयएमचे वारिस पठाण यांची मनसेतर्फे रविवारी जालन्यात प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी 'जोडे मारो' आंदोलन करण्यात आले.

बेताल वक्तव्यामुळे वारिस पठाण यांचा सर्व स्तरातून निषेध होत असून जालना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शहरातील स्वातंत्र्य सैनिक रामभाऊ राऊत चौकात त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घालून तोंडाला काळे फासून अंत्ययात्रा काढण्यात आली. वारिस पठाण यांनी माफी नाही मागितली तर त्यांच्या तोंडाला मनसेतर्फे काळे फसविण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत 'देश के गद्दारो को, गोली मारो सालो को, अशा घोषणाही देण्यात आल्या.

'मी माझे शब्द मागे घेतो', 48 तासानंतर वारिस पठाण नमले

दरम्यान, '15 करोड है पर 100 पर भारी है,' असे वादग्रस्त विधान करणारे MIM चे नेते वारिस पठाण यांनी आपले शब्द मागे घेत असल्याचे म्हटले आहे. तसेच फक्त 100 लोक या देशात असे आहेत की जे मुस्लीम समाजाविरोधात आहेत, अशा भाजप, आरएसएस, बजरंग दल या संघटनांच्या 100 लोकांविरोधात मी ते वक्तव्य केलं होतं,' अशी सारवासारव वारिस पठाण यांनी केलं होतं.

'मी माझे शब्द परत घेतोय, मी देशाचा सच्चा नागरिक आहे. मी सच्चा भारतीय मुस्लीम असून या महान देशावर माझं प्रेम आहे. मुस्लिमांचा संविधानावर विश्वास आहे,' असं वारिस पठाण पत्रकार परिषदेत म्हटले. वारिस पठाण यांनी वादग्रस्त वक्तव्य मागे घेतले असले तरीही या वक्तव्याबद्दल माफी मागितलेली नाही.

काय म्हणाले होते वारिस पठाण?

गुलबर्गा येथील एका जाहीर सभेत एमआयएमचे वारिस पठाण यांनी एक धक्कादायक विधान केलं होतं. ‘100 कोटी हिंदू जनतेवर 15 कोटी मुस्लीम भारी पडतील. आम्हाला स्वातंत्र्य दिलं जात नसेल तर ते मिळवावं लागले’ असं विधान त्यांनी केलं होतं. यानंतर असदुद्दीन ओवेसी यांनी वारीस पठाण यांच्याविरोधात कारवाई केली. वारिस पठाण यांना मीडियाशी बोलण्यास मनाई करण्यात आली होती. जोपर्यंत पक्षाकडून परवानगी दिली जात नाही तोपर्यंत मीडियाशी बोलता येणार नसल्याचं ओवेसींनी म्हटले होतं.

शिरच्छेद करणाऱ्यास 11 लाखांच्या बक्षिसाची घोषणा

वादग्रस्त वक्तव्यामुळे देशभरात वारीस पठाण यांच्यावर टीका करण्यात आली होती. आता तर हक-ए-हिंदुस्तान मोर्चा या मुस्लीम संघटनेने त्यांच्याविरोधात घोषणा केली आहे. वारीस पठाण याचा शिरच्छेद करा, हे करणाऱ्याला 11 लाखांचे बक्षीस देऊ अशी घोषणा या मुस्लीम संघटनेने केली आहे. यावेळी मुजफ्फरपूर येथील कंपनी बाग रोडवर मुस्लीम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वारीस पठाण याचा पुतळाही जाळला. हक-ए-हिंदुस्तान या संघटनेचे राष्ट्रीय संयोजक तमन्ना हाश्मी यांनी वारीण पठाणला देशद्रोही म्हटलं आहे.

First published: February 23, 2020, 3:13 PM IST

ताज्या बातम्या