मुंबईत घरासाठी प्रॉव्हिडंट फंडात जमा केलेले पैसे लॉकडाऊनमध्ये उपासमार होणाऱ्या 1500 लोकांना अन्न-धान्य पूरविणाऱ्या या जोडप्याचं उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी कौतुक केलं आहे. इतकचं नाही तर त्यांनी या जोडप्याला 4 लाखांची मदतही केली आहे.
मुंबई, 27 एप्रिल : महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आनंद महिंद्रा यांनी काही दिवसांपूर्वी एक ट्विट केलं होतं. यामध्ये एका रिक्षाचालकाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. यावेळी आनंद यांनी थेट असा डोकॅलिटी असणारा व्यक्ती आपल्या कंपनीत असावा अशी इच्छा व्यक्त केली होती. सर्वसामान्यांशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्याची आनंद महिंद्रांची ही पहिली वेळ नाही. या अगोदरही त्यांनी विविध विषय़ांवर ट्विट केले आहे. ज्यात ते रस्त्यावर फिरत असलेल्या एका व्यक्तीचे चित्र असो वा एखाद्या व्यक्तीने केलेल्या स्तुत्य कामाबद्दल चर्चा असो. ते केवळ ट्विट करुन थांबत नाहीत तर थेट मदतीची ऑफरदेखील देतात. महिंद्रा अँड महिंद्रा हे भारतातील प्रमुख 10 औद्योगिक घरांण्यांपैकी एक आहेत. आनंद महिंद्राचा जन्म 1 मे 1955 रोजी मुंबईत झाला. त्यांच्या वडिलांचे नाव हरीश महिंद्रा आणि आईचे नाव इंदिरा महिंद्रा. आनंद यांनी 1977 मध्ये अमेरिकेच्या हार्वर्ड कॉलेजच्या (केंब्रिज, मॅसेच्युसेट्स) व्हिज्युअल आणि पर्यावरणीय विभागातून पदवी संपादन केली. यानंतर ते बोस्टनहून व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर देशात परत आले. भारतात आल्यानंतर त्यांनी महिंद्रा युजाईन स्टील कंपनीत छोट्या पदावरुन काम सुरू केले. हळूहळू कामात जम बसू लागल्यानंतर 10 वर्षांनंतर ते महिंद्रा समूहचे डेप्युटी मॅनेजर झाले. भारत आणि परदेशात आपल्या कामासाठी अनेक अवॉर्ड मिळविलेले आनंद महिंद्राचे लग्न प्रख्यात पत्रकार अनुराधा मंहिंद्रा यांच्याशी झाले. त्या ‘मेन्स वर्ल्ड’ च्या संपादक आणि ‘रोलिंग स्टोन इंडिया’च्या मुख्य संपादक आहेत. त्यांना दोन मुलीही आहेत. आनंद महिंद्रा हे केवळ त्यांच्या व्यावसायिक कामासाठी ओळखले जात नाहीत, तर सर्वसामान्यांमध्येही त्यांची लोकप्रियता अफाट आहे. ज्या लोकांकडे दुर्लक्ष केलं गेलं आहे, अशा लोकांपर्यंत पोहोचणे ही आनंद महिंद्रा यांची खासियत आहे. सीएसआरअंतर्ग त्यांनी Rise for Good कार्यक्रम सुरू केला आहे. यात आरोग्यासाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, यासह अनेक विषयांवर काम केले जात आहे. कमकुवत आर्थिक परिस्थिती असलेले लोक या कार्यक्रमांशी थेट जोडलेले असतात. त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातात. महिंद्रा ग्रुपमध्ये काम करणाऱ्यांना ज्या कर्मचाऱ्यांना सामाजिक कार्यात रस आहे, त्यांनासुद्धा बरेच पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. याला ईएसओपीएस (Employee Social Options) म्हणतात. याअंतर्गत ज्या कर्मचाऱ्यांना समाजाशी जोडण्याची इच्छा असते ते सामाजिक कार्यात हातभार लावू शकतात. सीएसआर अंतर्गत होणारी सर्व कामे औपचारिक पद्धतीने केली जात नाहीत. तर दरमहा त्याचा अहवाल तयार केला जातो जो आनंद महिंद्रा स्वत: पाहतात. यावरुन त्यांचं सामाजिक कार्यातील आवड आपल्या लक्षात येईल. संबंधित - कोरोनाविरोधातील लढा आपण जिंकणारच! 8 महिन्यांची गर्भवतीही रणांगणात