पीलीभीत, 27 एप्रिल : देशभरातील सर्वजण कोरोनाविरूद्धचा (Coronavirus) लढा देत आहेत. पोलीस असोत किंवा आरोग्य कर्मचारी. सर्वजण आपले वैयक्तिक त्रास बाजूला ठेवून काम करण्यात व्यस्त आहेत. लॉकडाऊनचे काटेकोरपणे अनुसरण करण्याबरोबरच वेळेप्रसंगी लोकांना मदत करीत आहेत.
असंच एक प्रकरण पीलीभीत येथे समोर आले आहेत. येथे आरोग्य विभागात काम करणारी 8 महिन्यांची गर्भवती एएनएम आपलं कर्तव्य बजावत आहे. सर्व अडचणी असूनही, त्या म्हणतात की जी जबाबदारी असेल ती प्रामाणिकपणे पार पाडेन.
पूरणपूर कोतवाली परिसराच्या सिरसा चौकात तैनात एएनएम प्रीती 8 महिन्यांच्या गर्भवती आहेच. त्या राष्ट्रीय महामार्गावर बाहेरून येणाऱ्या पादचाऱ्यांची तपासणी करतात. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी तपासणी होणं आवश्यक आहे. यामुळे राज्याराज्यांमध्ये होणाऱ्या कोरोनाच्या फैलावावर नियंत्रण आणता येईल. अशा अवघड अवस्थेतही प्रीती यांचे मनोबल कमी झालेले नाही. तहान, भूक विसरुन त्या तेथे उभं राहून आपल्याला दिलेलं काम प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. यावर प्रीती सांगतात की, मला दिलेली जबाबदारी अत्यंत निष्ठेने पूर्ण करीत आहे.
विभागाला दिलेली माहिती
विभागाला याची माहिती आहे का? यावर प्रीती म्हणाल्या, ‘हो, माहिती आहे.’ डॉक्टर म्हणाले की, अजून चार दिवस ड्यूटी करा आणि त्यानंतर दुसरी एएनएम तैनात केली जाईल.’ पण प्रिती असेही सांगतात की, त्यांची कोणाकडेही तक्रार नाही. महामार्गावर प्रीती उन्हात त्यांच्या एका साथीदारासह सर्व प्रवाशांची सतत तपासणी करत असतात.
संबंधित -कोरोना लढ्यासाठी भाजप आमदाराने केली होती मदत; आता म्हणतायेत, पैसे परत करा
24 तासांत 60 मृत्यू! देशात आतापर्यंतचे दिवसभरातले सर्वाधिक बळी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india