JOIN US
मराठी बातम्या / देश / लोकसभेत पहिल्याच दिवशी गोंधळ, TMC खासदाराची अर्थमंत्री सीतारामन यांच्या पेहेरावावर शेरेबाजी

लोकसभेत पहिल्याच दिवशी गोंधळ, TMC खासदाराची अर्थमंत्री सीतारामन यांच्या पेहेरावावर शेरेबाजी

‘एका ज्येष्ठ खासदाराने मंत्र्यांबद्दल असं वक्तव्य करणं योग्य नाही.’

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 14 सप्टेंबर: संसदेचं अधिवेशन सोमवारपासून सुरू झालं. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तृणमूलचे खासदार सौगत रॉय (Saugata Roy) यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांच्या पेहेरावाबद्दल शेरेबाजी केल्याने एकच गोंधळ झाला. त्यामुळे त्यांचं वक्तव्य कामकाजातून काढून टाकण्यात आलं. बॅकिंग नियमन विधेयकावर बोलतांना रॉय यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या पेहेरावाबद्दल कमेंट केली. त्यावरून सभागृहात एकच वादळ निर्माण झालं. भाजपने त्यावर आक्षेप घेतला. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी रॉय यांनी माफी मागावी असं सूचवलं. एका ज्येष्ठ खासदाराने मंत्र्यांबद्दल असं वक्तव्य करणं योग्य नसल्याचंही ते म्हणाले. तर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी रॉय यांचं वक्तव्य कामकाजातून काढून टाकण्याची घोषणा केली. रॉय यांनी मात्र माफी मागण्यावर म्हणाले, मी कुठेही असंसदीय भाषेचा वापर केलेला नाही. कोरोना उद्रेकानंतरचं हे पहिलंच अधिवेशन आहे. त्यामुळे अधिवेशनात सगळ्याच गोष्टी बदललेल्या आहेत. खासदारांच्या आसन व्यवस्थेपासून ते कामकाजापर्यंत प्रत्येक गोष्टी बदलली आहे. अनेक खासदारांच्या चाचणीचे रिझल्ट अजुन मिळालेले नाही अशी नाराजी काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी व्यक्त केली आहे. संसदेचं अधिवेशन सोडून राहुल गांधी परदेशात; सरकारला घेरण्याची संधी पुन्हा गमावली संसदेत दररोज फक्त 4 तास कामकाज होणार आहे. जवळपास सर्वच कामकाज डिजिटल पद्धतीने होणार असून प्रश्नांची उत्तरही Online पद्धतीनेच दिली जाणार आहेत. 14 सप्टेंबरपासून सुरू झालेलं संसदेचं पावसाळी अधिवेशन हे 1 ऑक्टोबरपर्यंत चालेल. या काळात, सलग 18 बैठका पार पडती, ज्यामध्ये 45 विधेयक आणि 11 अध्यादेश आणले जातील. यानंतर संसदेचं कामकाज सुरू करण्यात येईल अशी शक्यता आहे. लोकांची कामं न करणाऱ्या लोकप्रतिनिधींना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही : कोर्ट संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आठवड्याच्या 7 ही दिवशी होईल. यावेळी आठवड्याची सुट्टी मिळणार नाही. दररोज 4 तास दोन्ही सत्रांचं कामकाज सुरू असेल. तर अधिवेशनाता पहिला दिवस वगळता उर्वरित राज्यसभा सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत पार पडणार, तर लोकसभा संध्याकाळी 3 ते सायंकाळी 7 या वेळेत असेल अशी माहिती देण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या