JOIN US
मराठी बातम्या / देश / ‘देशात 30 टक्के बोगस लायसन्स; पण आम्ही काहीच करू शकत नाहीत’

‘देशात 30 टक्के बोगस लायसन्स; पण आम्ही काहीच करू शकत नाहीत’

देशात 30 टक्के बोगस परवाना धारक चालक असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 08 जुलै : देशात सध्या वाहन चालकांच्या परवानाचा प्रश्न चर्चिला जात आहे. याबद्दल लोकसभेत देखील प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशात 30 टक्के परवाने हे बोगस असून त्यावर आम्ही काहीच करू शकत नाही असं उत्तर दिलं आहे. बोगस परवानाधारकांची वाढती संख्या रोखण्यासाठी संसदेत रस्ता सुरक्षेशी संबंधित विधेयक संमत करावं लागेल अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. देशात सध्या मोठ्या प्रमाणात रस्ते अपघात होत आहेत. यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. चालकांच्या चुकीमुळे देखील अनेक अपघात होताना दिसत आहे. रस्ते अपघात होण्यामध्ये तामिळनाडूमध्ये सर्वात शेवटच्या नंबरवर आहे. रस्ते अपघात कमी झाले पाहिजेत. त्यासाठी उपाययोजना देखील झाल्या पाहिजेत. त्याकरता कोणतंही राजकारणमध्ये न आणता रस्ता सुरक्षा विधेयक संमत झालं पाहिजे असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. केवळ वाहनांच्या वेगावर नियंत्रण मिळवून अपघात रोखता येणार नाहीत. त्याकरता रस्ता सुरक्षा विधेयकाचा आधार घेत गाड्यांमध्ये देखील बदल करावा लागणार आहे. वाहनांमध्ये सुधारणा केल्यानंतर रस्ते अपघातांमध्ये घट होईल अशी माहिती नितीन गडकरी यांनी लोकसभेत उत्तर देताना दिली. हायकोर्टानं स्वत:लाच ठोठावला एक लाखांचा दंड; जाणून घ्या कारण रस्ते अपघातांची संख्या वाढतेय देशात सध्या दिवसेंदिवस रस्ते अपघातांची संख्या वाढताना दिसत आहे. वेगानं गाडी चालवणे, चालकाचा अनुभव, रस्त्यांची परिस्थिती, गाड्यांची स्थिती यासारखी अनेक कारणं सध्या रस्ते अपघातांसाठी कारणीभूत ठरताना दिसत आहेत. त्यावर देखील चिंता व्यक्त केली जात आहे. रस्ते विभागाकडून देखील त्यावर विविध कार्यक्रम राबवून जागृकता निर्माण केली जात आहे. टॉप 18 न्यूज VIDEO: चंद्रपुरात 3 वाघांचा मृत्यू, ही आणि यासह अन्य टॉप 18 बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या