मुंबई, 30 ऑगस्ट : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकांच्या विलिनीकरणाबद्दल महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. बँकिंग यंत्रणेमध्ये मोठ्या सुधारणा होणार आहेत. यापूर्वी देशात 27 बँका होत्या.आता देशात 12 सरकारी बँका राहतील. पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक यांचं एकत्रीकरण करण्यात आलं आहे. कॅनरा बँक आणि सिंडिकेट बँक यांचंही एकत्रीकरण होणार आहे. बँकिंग क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी सरकारने महत्त्वाची पावलं उचलली आहेत. नीरव मोदीच्या भ्रष्टाचार प्रकरणासारखी परिस्थिती ओढवू नये म्हणून बँकांसाठी काटेकोर नियम करण्यात आले आहेत. 250 कोटींपेक्षा जास्त कर्ज दिलेल्या उद्योगांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. इंडियन बँक आणि अलाहाबाद बँकेचं एकत्रीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
बँकांना उभारी देण्यासाठी निधी बँकिंग क्षेत्राला उभारी देण्यासाठी 70 हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. यामुळे बँकांना व्याजदर कमी करण्यासाठी मदत मिळेल. त्याचबरोबर घरं, वाहन आणि अन्य प्रकारचं कर्ज स्वस्त होऊ शकेल. आता देशातल्या 8 बँकांनी त्यांचे व्याजदर रेपो रेटशी जोडले आहेत, अशी माहितीही निर्मला सीतारामन यांनी दिली.
याआधी स्टेट बँक ऑफ हैदराबाद, भारतीय महिला बँक यासारख्या बँका स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीन करण्यात आल्या होत्या. ========================================================================================================= ‘ऑस्ट्रेलियाचा राजा’, लालबागहून सातासमुद्रापार पोहोचली बाप्पाची भलीमोठी मूर्ती