दुर्ग, 10 मे : लॉकडाऊनमध्ये पोलिसांना विविध प्रकारची कामे करावी लागत आहे. अगली लॉकडाऊनमध्ये नागरिकांना घराबाहेर पडण्यापासून रोखण्याबरोबरच अनेक प्रकारची मदत नागरिकांसाठी केली जात आहे. आता तर लॉकडाऊनमध्ये पोलिसांना रागाने घर सोडून गेलेल्या पत्नीलाही आणण्याची जबाबदारी पडली. छत्तीसगडमधील दुर्ग जिल्हा पोलिसांनी एक महिला आणि तिच्या 11 वर्षांच्या मुलाली ग्वालियरमधून आणले आहे. लॉकडाऊन (Lockdown) सुरू असतानाही विशेष परवनागी घेऊन दुर्गचे पोलीस ग्वालियरला गेले होते. पती – पत्नीमधील वादामुळे पोलिसांना ही जोखीम उचलावी लागली. पतीसोबत भांडण झाल्यानंतर पत्नी आपल्या 11 वर्षांच्या मुलीसह घरात कोणाला काहीही न सांगता निघून गेली. मात्र पतीला याबाबत माहीत नसल्याने त्याने पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी महिलेचे मोबाइल लोकोशन ट्रेस केल्यानंतर ती ग्लालियरला असल्याची माहिती समोर आली. महिलेच्या पतीने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई तरीच त्याच्या पत्नी व मुलीला ग्वालियरमधून सुखरुप आणले. तक्रारदाराने सांगितल्यानुसार एका छोटाशा कारणावरुन पत्नीचा त्याच्यासोबत वाज झाला. त्यानंतर ती घर सोडून निघून गेली. शिवाय सोबत आल्या 11 वर्षांच्या मुलीलाही घेऊन गेली. यादरम्यानच सरकारने लॉकडाऊन लागू केला होता. मोबाइल लोकेशन केला ट्रेस दुर्ग पोलिसानी महिलेचा मोबाइल लोकोशन ट्रेस केला आणि त्यानुसार ती ग्वालियरला असल्याचे समोर आले. पोलिसांनी महिला व तिच्या मुलीला ताब्यात घेतले आहे. यावर महिलेने सांगितलं की, पतीसोबत वाद झाल्याने ती ग्वालियरला फेसबुक फ्रेंडला भेटायला गेली होती. काही दिवस फ्रेंडकडे थांबली. मात्र जेव्हा घरी जाण्याची तयारी केली त्यादरम्यान लॉकडाऊन लागू झाला. त्यामुळे ती अडकून पडली होती. तिच्याकडील पैसेही त्यात संपले होते. संबंधित- कार्गो ऑपरेशनअंतर्गत चीनहून परतलेले एअर इंडियाचे पायलट कोरोना पॉझिटिव्ह ऑर्थर रोडनंतर आता भायखळा तुरुंगातही घुसला ‘कोरोना’, महिला कैदी पॉझिटिव्ह