JOIN US
मराठी बातम्या / देश / Covid - 19 : मंत्री शिंकल्याने अख्ख्या राज्यात घबराट, जनतेकडून केली जातेय विचारपूस

Covid - 19 : मंत्री शिंकल्याने अख्ख्या राज्यात घबराट, जनतेकडून केली जातेय विचारपूस

या मंत्र्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर नागरिकांकडून त्यांना संदेश पाठवले जात आहेत

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 12 मे : कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) देशभरात सोशल डिस्टन्सिंगचं महत्त्व वाढलं आहे. याशिवाय सर्दीसारख्या साधारण वाटणाऱ्या आजाराबाबतही भीती निर्माण झाली आहे. अशीच एक घटना तेलंगणात घडली आहे. तेलंगणाचे मंत्री केटी रामाराव (KT Rama Rao) यांना कार्यक्रमादरम्यान सलग शिंका आल्या. त्यामुळे जनतेमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. केटी रामाराव तेंलगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा मुलगा आहे. ते सत्ताधारी पक्ष तेलंगणा राष्ट्रीय समिती (TRC) चे कार्यकारी अध्यक्ष आणि राज्यातील आयटीमंत्रीदेखील आहेत. सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये केटीरामाराव तोंडावर रुमाल ठेवून सलग शिंकत आहेत. केटीआर म्हणजेच केटी रामराव लॉकडाऊनदरम्यान राज्यातील विविध भागांना भेट देत आहेत. या प्रवासादरम्यान त्यांना सर्दी झाली होती. मात्र कोरोना व्हायरसच्या परिस्थितीत सर्दीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. यामुळे सोशल मीडियावर त्यांना जनेकडून सातत्याने संदेश जात आहेत, की त्यांनी स्वत:ची काळजी घ्या. केटीआरच्या समर्थकांनी ट्विट केलं आहे, - केटीआर सर. तुमच्याच फ्लूची लक्षणे आहे हे ऐकून चिंतेत आहे. तुम्ही कोरोना वॉरियर आहात. कृपया आपल्या तब्येतीची काळजी घ्या. तुम्ही आमचा विश्वास आहात. काळजी घ्या.

संबंधित बातम्या

यानंतर केटीआरनेही आपल्या चाहत्यांच्या ट्विटला उत्तर दिलं आहे. ते म्हणतात – मी ठीक आहे. मला एलर्जीमुळे सर्दी झाली होती. मात्र मी माझा प्रवास थांबवू इच्छित नाही. माझ्यामुळे काहींना त्रास झाला. यासाठी मी माफी मागतो. संबंधित - आणखी 31 देशातून भारतीयांना आणणार; मोदी सरकारचे वंदे मातरम मिशन दुसऱ्या टप्प्यात

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या