जाहिरात
मराठी बातम्या / देश / आणखी 31 देशातून भारतीयांना आणणार; मोदी सरकारचे वंदे मातरम मिशन दुसऱ्या टप्प्यात

आणखी 31 देशातून भारतीयांना आणणार; मोदी सरकारचे वंदे मातरम मिशन दुसऱ्या टप्प्यात

आणखी 31 देशातून भारतीयांना आणणार; मोदी सरकारचे वंदे मातरम मिशन दुसऱ्या टप्प्यात

या मिशनअंतर्गत आतापर्यंत हजारो नागरिकांना भारतात परत आणण्यात आले आहे. त्यांना सध्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 12 मे : देशभरात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या या लॉकडाऊनमुळे विविध देशांमध्ये भारतीय नागरिक अडकून पडले आहे. त्यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने वंदे मातरम मिशन (Vande Mataram) सुरू केले आहे. लवकरच त्याचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात विविध देशांमधून भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यात आले. आता दुसऱ्या टप्प्यात 31 देशांमधील भारतीयांना मायदेशी आणण्यात येणार आहे. 16 ते 22 मे दरम्यान वंदे मातरम मिशनचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. यामध्ये 149 फ्लाइट्सच्या साहाय्याने भारतीयांना मायदेशी आणण्यात येणार आहे. रविवारी मध्यरात्री दीड वाजता वंदे मातरम मिशनमधील पहिलं विमान मुंबईत पोहोचलं. 325 प्रवाशांना घेऊन हे स्पेशल विमान लंडनमधील हिथ्रो एअरपोर्टहून निघालं होतं. लंडनमध्ये गेल्या दीड महिन्यापासून काही विद्यार्थी आणि यात्रेकरु अडकले होते. त्या सगळ्यांना मुंबईत आणण्यात आलं आहे. सर्व प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. नंतर सगळ्यांना मुंबईतील वेगवेगळ्या हॉटेलमध्ये 14 दिवस क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. परदेशात अडकलेल्या भारतीयांना वंदे भारत मिशन अंतर्गत रविवारी मायदेशात आणण्यात आले.  लंडनहून मुंबईत पहिले विमान दाखल झालं आहे. त्यानंतर सिंगापूर आणि मनीला येथून दोन विमाने मुंबईत पोहोचणार आहेत. दरम्यान कोरोनाच्या संकटात भारतातील सुमारे 2 लाख लोकं परदेशात अडकले आहेत. त्यांना परत आणण्याचे काम सरकारने सुरु केलं आहे. 7 ते 13 मे या कालावधीत एअर इंडियाच्या विमानांच्या 64 फेऱ्या होणार आहेत. त्यात 14 हजार 800 भारतीयांना परत आणले जाणार आहे. संबंधित -  113 वर्षांच्या आजीने कोरोनाला हरवलं; व्हायरसमुक्त होणारी सर्वात वयस्कर रुग्ण

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात