JOIN US
मराठी बातम्या / देश / बापरे! देशात 24 तासांत आत्तापर्यंत सर्वात जास्त 3900 नवे रुग्ण आणि 195 जणांचा मृत्यू

बापरे! देशात 24 तासांत आत्तापर्यंत सर्वात जास्त 3900 नवे रुग्ण आणि 195 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रानंतर आता तामिळनाडू हे कोरोना वेगाने वाढणारं दुसरं राज्य झालं आहे. तिथे एकाच दिवसांत 500 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

जाहिरात

अमेरिकेत सगळ्यात जास्त लोक रिकव्हर झाले आहेत. अशा रुग्णांची संख्या तिथे 20 लाखांपेक्षा जास्त आहे. पण जगळ्यात जास्त कोरोनाबाधित रुग्णही अमेरिकेतच आहेत.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 05 मे: कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने सगळ्यांची चिंता वाढली आहे. लॉकडाऊन संपायचे दिवस आणि रुग्णांची संख्या वाढायची वेळ एकच होत आहे. तर टेस्टिंग वाढविल्यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचं स्पष्टीकरण आरोग्य मंत्रालयाने दिलं आहे. देशात गेल्या 24 तासांमध्ये 3900 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या वाढून 46433 झाली आहे. त्यात 32138 Active रुग्ण आहेत. तर गेल्या 24 तासांमध्ये 195 जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्तची ही सर्वात जास्त संख्या आहे. त्यामुळे देशातल्या मृतांचा एकूण आकडा 1568वर गेला आहे. तर आत्तापर्यंत 12726 जण बरे झाले आहेत. महाराष्ट्रानंतर आता तामिळनाडू हे कोरोना वेगाने वाढणारं दुसरं राज्य झालं आहे. तिथे एकाच दिवसांत 500 नवे रुग्ण आढळून आले आहेत. देशात आता 12 दिवसांमध्ये रुग्णांची संख्या दुप्पट होत असल्याचं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. तर सोशल डिस्टन्सिंगसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने नवे नियम जाहीर केले आहे. त्यात लग्नासाठी फक्त 50 जणांना आणि अंत्यसंस्कारासाठी 20 जणांनाच एकत्र येण्याची परवानगी देण्यात आली आहे. या व्हायरसचा नाश करेल असं औषध नाही. मात्र उपलब्ध असलेल्या इतर औषधांचा या व्हायरसवर कसा परिणाम होतो याबाबत प्रयोग केले जात आहेत. अशीच काही औषधं वापरून उपचार केले जात आहेत. त्यात आता हायड्रोक्लोरोक्विन (hydroxychloroquine) आणि रेमडेसिवीर (Remdesivir) औषध कोरोनाव्हायरसविरोधात प्रभावी असल्याचं सांगितलं जातं आहे. यापैकी कोणतं औषध प्रभावी आहे, याबाबत तज्ज्ञांनी मत व्यक्त केलंय. हे वाचा -  वडिलांनी घरीच प्राण सोडला, वेटिंग असल्याने 19 दिवसांनी झाले अंत्यसंस्कार काऊन्सिल ऑफ सायन्टिफिक अँड इन्डस्ट्रिअल रिसर्चचे (Council of Scientific & Industrial Research - CSIR) डायरेक्टर डॉ. शेखर सी मांडे यांनी रेमडेसिवीर आणि हायड्रोक्लोरोक्विन यापैकी कोणतं औषध प्रभावी आहे, याबाबत माहिती दिली आहे. हे वाचा -   VIDEO: Live करताना रिपोर्टरने घातली नव्हती पॅन्ट, कॅमेरा झूम झाला आणि… डॉ. शेखर सी. मांडे म्हणाले, या दोन्ही औषधांमध्ये सध्या तुलना करणं योग्य नाही कारण रेमडेसिवीरला यूएसमध्ये अतिशय गंभीर रुग्णांवर उपचारासाठी मंजुरी देण्यात आली आहे. शिवाय या दोन्ही औषधांचे सध्या ट्रायल सुरू आहे, त्यामुळेदेखील त्यांची तुलना करू शकत नाही. त्यामुळे आता तरी कोणतं औषधं चांगलं आहे आणि कोणतं नाही हे सांगू शकत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या