Home /News /videsh /

वडिलांनी घरीच प्राण सोडला, वेटिंग असल्याने 19 दिवसांनी झाले अंत्यसंस्कार ; न्यूयॉर्कमधल्या भारतीयाचा थरारक अनुभव

वडिलांनी घरीच प्राण सोडला, वेटिंग असल्याने 19 दिवसांनी झाले अंत्यसंस्कार ; न्यूयॉर्कमधल्या भारतीयाचा थरारक अनुभव

'ते गेले त्या दिवशी कोरोनामुळे शहरात 799 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे अंत्यसंस्काराला जागाच नव्हती.'

    न्यूयॉर्क 04 मे: अमेरिकेतलं न्यूयॉर्क शहर हे कोरोनाचं जगातलं हॉटस्पॉट ठरलं. जगात सर्वात एव्हरग्रीन असणारं हे शहर सध्या मरणकळा अनुभवत आहेत. न्यूयॉर्कमध्ये गेली चार दशकं राहणाऱ्या एका कुटुंबानं सांगितलेला त्यांचा अनुभव अतिशय ह्रदयद्रावक आहे. कुटुंब प्रमुखाने कोरोना सदृष्य आजारामुळे घरातच प्राण सोडले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांनी तब्बल 19 दिवस लागले. त्यावेळी शेवटचा निरोप देण्यासाठी कुणालाही जाता आलं नाही. न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या आनंद मुलीया यांची ही हेलावणारी कहाणी CNNने दिली आहे. आनंद मुलीया हे पत्नी आणि दोन मुलांसह न्यूयॉमध्ये राहतात. पत्नी रंजना आणि दोन मुलं अक्षय आणि अमित. असं चौघांचं सुखी कुटुंब. पण एप्रिल महिन्याच्या 8 तारखेला त्यांचं आयुष्यच बदलून गेलं. 56 वर्षांच्या आनंद यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं. त्यांना कुठलाही आजार नव्हता. आनंद आपल्या खोलीतून स्वयंपाकघरात आले. त्यावेळी सगळेच त्यांच्या जवळ जमले होते. अमितने वडिलांना खुर्चीवर बसवून Ambulance ला फोन केला. 10 मीनिटांमध्ये ते आले आणि त्यांना ऑक्सिजन दिला मात्र काही कळण्याच्या आताच अमितच्या हातामध्येच त्यांनी प्राण सोडला. त्यांना कोव्हिड19 झाला असल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली. हे वाचा -Lockdown: ‘सरबत’मध्ये साखर जास्त टाकल्याचा राग, आरोपीने केली बहिण-भावाची हत्या आनंद मुलीयांचं पार्थिव हॉस्पिटलच्या शवगृहात ठेवण्यात आलं. कारण स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जागाच नव्हती. ते गेले त्या दिवशी कोरोनामुळे शहरात 799 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे 27 एप्रिलला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सोशल डिस्टन्सिंगचे नियम असल्यानं त्यांच्या अंत्यसंस्कारलाही जाता आलं नाही याच खंत दोन्ही मुलं आणि त्यांच्या आईला आहे. हेही वाचा - ‘आम्ही फक्त मरणाची वाट पाहतोय’, या देशात कोरोनाच्या ‘त्सुनामी’ची शक्यता चीननं असा पसरवला जगभरात कोरोना, अमेरिकेला मिळाला सर्वात मोठा पुरावा
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या