JOIN US
मराठी बातम्या / देश / गोव्यातील डॉक्टरची माणुसकी; कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना 'जादूच्या झप्पी'ने निरोप

गोव्यातील डॉक्टरची माणुसकी; कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना 'जादूच्या झप्पी'ने निरोप

कोरोना योद्धा रुग्णांची काळजी घेतात, नागरिकांचं संरक्षण करतात आणि मिठी मारुन त्यांना आधार देणारे असतात कोरोना एंजल.

जाहिरात

हैदराबादमध्ये याआधीही पार्टी आणि इतर कार्यक्रम आयोजित करण्याच्या अशा घटना घडल्या असून त्यामुळे काही जणांचा मृत्यू सुद्धा झाला आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पणजी, 7 जुलै : गेल्या काही दिवसांपासून गोव्यात काही अटींसह पर्यटनाला सुरुवात झाली आहे. मात्र यामध्ये काही रुग्णही सापडत असल्याचे चिंता कायम आहे. गोव्यातील एक डॉक्टर कोरोना व्हायरसमधून बऱ्या झालेल्या रुग्णांना अनोख्या प्रकारे निरोप देत असल्याचे समोर आले आहे. एरवी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात असताना हे डॉक्टर कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना मिठी मारुन निरोप देत आहेत. गोवा मेडिकल कॉलेज मेडिसीन विभागाचे डॉक्टर एडविन गोम्स यांनी गेल्या तीन महिन्यांत कोरोनातून बरे झालेल्या 190 रुग्णांना मिठी मारुन निरोप देत आहेच. हे वाचा- ‘तेरी मासूम हँसी पे, मैं जी लेता हू’ सुशांतच्या स्माईलमागे होतं इतकं दु:ख की… मडगावमधील कोविड - 19 रूग्णांवर उपचार करणाऱ्या ईएसआय हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या टीममध्ये गोम्स आघाडीवर आहेत. रुग्णालयात 98 दिवसांच्या ड्युटीनंतर घरी परत आलेले गोम्स म्हणाले की, रूग्णालयातून बरे होऊन बाहेर पडलेल्या रुग्णांनी मी मिठी मारली आहे. डॉक्टर म्हणाले की, समाजातील रुग्णांना बहिष्कृत न करण्याचा संदेश आहे. त्यांनी याचे वर्णन ‘कोविड एंजल’ म्हणून केले आहे. हे वाचा- Lockdown असतांनाच भाजपच्या आमदाराची दारु पार्टी, केली मौज; पाहा VIDEO ते म्हणाले, बरे झालेल्या रुग्णांचा प्लाझ्मा इतर रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. डॉक्टरांनी सांगितले की बरे झालेले लोक हा अनुभव इतरांना सांगण्यासाठी योग्य व्यक्ती असतात. गोव्यामध्ये कोरोना संसर्गाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. 18 मे ते 1 जून दरम्यान गोव्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण 0.24 टक्के होते. 19 जून ते 2 जुलै या कालावधीत ती वाढून 3.6 टक्के झाले आहे. राज्यात कोरोना विषाणूची 1761 पेक्षा जास्त प्रकरणे आहेत. संपादन - मीनल गांगुर्डे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या