JOIN US
मराठी बातम्या / देश / पत्नीच्या मृत्यूनंतर अर्ध्या तासात चक्र फिरलं; रुग्णालयाजवळच टांगलेल्या अवस्थेत आढळला पतीचा मृतदेह

पत्नीच्या मृत्यूनंतर अर्ध्या तासात चक्र फिरलं; रुग्णालयाजवळच टांगलेल्या अवस्थेत आढळला पतीचा मृतदेह

या जोडप्याला तीन मुलं आहे. त्यांच्या डोक्यावर आई व बाप दोघांचाही हात राहिलेला नाही, ही अत्यंत दु:खदायक बाब आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कानपूर, 9 जून : कोरोनामुळे परिस्थिती अधिकाधिक बिकट होत चालली आहे. दरम्यान कानपूरमधील एका जिल्ह्यात वेदनादायक घटना समोर आली आहे. पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर पतीनेही रुग्णालयाच्या आवारातील निवारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत जोडप्याला तीन मुलेही आहेत. जी पालकांच्या मृत्यूनंतर अनाथ झाली आहेत. उन्नाव येथील रहिवासी असलेल्या मुकेश नावाच्या व्यक्तीचा मृतदेह पोलिसांनी पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे. अर्ध्या तासानंतर पतीनेही केली आत्महत्या या वृत्तानुसार, शुक्लगंज उन्नावमधील पोनी रोडवरील झंडेवाला चौकाजवळ राहणारा सोहनलाल कश्यपचा मुलगा मुकेश कश्यप कानपूरमधील जनरल गंज येथे फॅब्रिक फर्ममध्ये कामाला होता. त्यांच्या कुटुंब पत्नी व तीन मुले असा परिवार आहे. काही दिवसांपूर्वी मुकेशच्या पत्नीला कावीळ झाल्याच्या तक्रारीमुळे शुक्लगंज येथील नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान तिची प्रकृती अधिक खालावली. त्यानंतर डॉक्टरांनी तिला उर्सला रुग्णालयात पाठविले. सोमवारी रात्री उपचारादरम्यान मुकेशच्या पत्नीचा उर्सला रुग्णालयात मृत्यू झाला. मुकेशच्या सासू सुशीलाच्या म्हणण्यानुसार, मुलीच्या निधनानंतर जावई मुकेश ओक्साबोक्शी रडायला लागला आणि बराच काळ एकाच जागी बसून होता, तो कोणाशीही काहीही न बोलता निघून गेला. सुमारे अर्ध्या तासानंतर हॉस्पिटलच्या लोकांनी निवारागृहात एकाने वायरला लटकून आत्महत्या केल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाला दिली. मृत व्यक्ती आपला जावई मुकेश असल्याची माहिती जेव्हा त्यांची सासू सुशीला यांना कळाली तेव्हा त्यांना धक्काच बसला. मुकेशने घरात वायरला लटकून आत्महत्या केल्याची माहिती पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला व पोस्टमॉर्टमसाठी पाठविला. मुकेश आणि त्यांची मुलगी विवाहित असल्याचे मृताच्या सासूने सांगितले. हे वाचा- लॉकडाऊनमध्ये ParleG ने मोडले विक्रीचे सारे रेकॉर्ड्स संपादन - मीनल गांगुर्डे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या