नवी दिल्ली, 16 जून : एलएसीवर भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावाने हिंसक रुप घेतलं होतं. या दोघांमध्ये झालेल्या चकमकीत मोठं नुकसान झालं आहे. ज्यामध्ये कर्नल संतोष बाबू (बिहार रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर) आणि इतर दोन जवान शहीद झाले आहेत. पीपल्स लिबरेशन आर्मीचा तंबू हटवण्यासाठी सैन्याने (भारतीय) कारवाई सुरू केली तेव्हा ही घटना घडली. हा तंबू पोजिशन कोड-पेट्रोलिंग पॉईंट 14 जवळ ठेवण्यात आला होता, जो वास्तविक नियंत्रण रेषेजवळील भारताच्या भागात येतो. याची सुरूवात कशी झाली याविषयी काही माहिती समोर आली आहे, परंतु या घटनेची माहिती असलेल्या सरकारी सूत्रांनी सांगितले की, पीएलए सैनिकांनी पॉईंट 14 व्या वरच्या दिशेने उंचीवरुन दगड फेकून उत्तर दिलं होतं. त्यानंतर लोखंडी सळई, रॉड्स याचा हल्लासाठी वापर केला. या लढाईत दोन्ही सैन्य दलाच्या जवानांना गंभीर दुखापत झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या सैनिकांना उपचारासाठी सैन्य रुग्णालयात नेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. पॉईंट 14 गालवान आणि श्योक नद्यांच्या संगमाजवळ आहे. गेल्या आठवड्यात त्याच ठिकाणी विभागीय कमांडर-स्तरीय बैठक झाली होती, तेथे भारतीय सैन्य आणि पीएलएने सैन्य कमी करण्यास सहमती दर्शविली. एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की कर्नल बाबू यांचं निधन नेमकं कोणत्या परिस्थितीत झालं याचा शोध घेतला जात आहे. ते म्हणाले की, लढाई टाळत असताना पीएलएच्या सैनिकांनी त्यांना निशाण्यावर धरलं स्थानिक पीएलए कमांडर, सरकारी सूत्रांनी सांगितले की, लढाई टाळण्यासाठी मंगळवारी सकाळी बैठक बोलावली गेली होती, ज्यामध्ये स्थानिक स्तरावरील लष्करी चर्चा व्हावी हा उद्देश आहे. हे वाचा- लडाख सीमेवर भारत-चीन चकमक; मोदी सरकारची पहिली प्रतिक्रिया