JOIN US
मराठी बातम्या / देश / वडिलांचा मृतदेह घेऊन दिवसभर भटकत होता मुलगा; अखेर हिंदूंनी दफनासाठी दिली स्वत:ची जागा

वडिलांचा मृतदेह घेऊन दिवसभर भटकत होता मुलगा; अखेर हिंदूंनी दफनासाठी दिली स्वत:ची जागा

जात आणि धर्मापेक्षा माणुसकी जास्त महत्त्वाची आहे. अशा कठीण प्रसंगात जो आपल्या पाठीशी उभा राहतो त्याच्यासोबतचं नातं जाती-धर्माच्या पलीकडचं असतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हैद्राबाद, 28 मे : कोरोनाची (Coronavirus) भीती लोकांमध्ये इतकी पसरली आहे की कोणाच्या मृतदेहाचे दफन करण्यासाठीही लोक नकार देत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना तेलंगणातील हैद्राबादमध्ये घडली आहे. येथे एका मुस्लीम व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती कळताच लोकांनी तो कोरोनाचा रुग्ण असल्याच्या संशयाने त्याचा मृतदेह दफन करण्यास नकार दिला. मात्र या व्यक्तीचा मृत्यू ह्रदयाचा झटका आल्याने झाला होता. कुटुंबीय त्या ज्येष्ठ व्यक्तीचा मृतदेह घेऊन इथे-तिथे भटकत होते. मात्र कोणीच मदतीसाठी पुढे आलं नाही. शेवटी दोन हिंदू व्यक्तींनी त्यांचे शव दफन करण्यासाठी आपली जागा दिली. रंगारेड्डी जिल्ह्याचे गंडमगुडा परिसरात राहणारे मोहम्मद खाजा मिया (55) यांचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्याने झाला होता. कुटुंबीयांची त्यांचा मृतदेह दफन करण्यासाठी कब्रिस्तानात गेले तेव्हा कोरोनाचं संक्रमण होईल या भीतीने त्याला विरोध करण्यात आला. यानंतर दिवसभर मुलगा आपल्या वडिलांचा मृतदेह घेऊन शहरातील विविध कब्रिस्तानात विचारपूस करीत होता. मात्र कोणीच त्याच्या मदतीसाठी पुढे आलं नाही. अखेर संदीप आणि शेखर नावाच्या दोन व्यक्तीनी वडिलाचा मृतदेह दफन करण्यासाठी स्वत:ची जागा दिली. हे वाचा- कोरोनामुळे जगावरील ‘हे’ संकट आणखी वाढणार; कोट्यवधी लोकांना सामना करावा लागणार मुंबईतही आली टोळधाड; शोभा डेंपासून अनेकांनी शेअर केले फोटो

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या