Home /News /news /

कोरोनामुळे जगावरील 'हे' संकट आणखी वाढणार; कोट्यवधी लोकांना सामना करावा लागणार

कोरोनामुळे जगावरील 'हे' संकट आणखी वाढणार; कोट्यवधी लोकांना सामना करावा लागणार

जगातील कोट्यवधी लोकं आधीपासूनच या संकटाचा सामना करत आहेत, कोरोनामुळे या लोकांची संख्या दुप्पट होण्याची शक्यता आहे.

    नवी दिल्ली, 28 मे : संपूर्ण जगात कोरोनाव्हायरस (coronavirus) थैमान घालतो आहे. मात्र या संकटात जगात आधीपासूनच असलेलं संकट आणखी वाढणार आहे आणि हे संकट म्हणजे उपासमारी. ज्याचा सामना कोट्यवधी लोकं आधीपासूनच करत आहेत, त्यात आणखी कोट्यवधी लोकांची भर पडणार आहे. अन्न ही प्रत्येक सजीवाची गरज. अन्नाशिवाय कोणताच माणूस जगू शकत नाही. असं असलं तरी जगभरातील कोट्यवधी लोकांना खायला अन्न मिळत नाही आहे. हे सत्य आणि आणि कोरोनाव्हायरसमुळे ही परिस्थिती आणखीन भीषण होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. ग्लोबल नेटवर्क अगेन्स्ट फूड क्रायसेसद्वारा जारी करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, 2020 मध्ये उपासमारीचा सामना करणाऱ्या लोकांची संख्या दुप्पट होऊ शकते आणि कोरोनाव्हायरसमुळे अशी परिस्थिती ओढावू शकते, असं सांगितलं जातं, आहे. रिपोर्टनुसार 2019 मध्ये जवळपास 13.5 कोटी लोकं उपासमारीचा सामना करत होते. 2020 मध्ये हा आकडा 26.5 कोटी होण्याची शक्यता आहे. कोरोनाव्हायरसमुळे ओढावलेलं आर्थिक संकट याला जबाबदार ठरू शकतं, असं मानलं जातं आहे. भूकमारीशी सर्वात जास्त झुंज देत आहे तो आफ्रिका. आफ्रिकेची परिस्थिती सर्वात खराब आहे. फक्त उत्तर नायजेरियातच 70 लाख लोकं भूकमारीचा सामना करत आहेत. त्यानंतर मीडल ईस्ट आणि आशिया आहे. दोन्ही क्षेत्रात जवळपास 12 कोटी लोक भूकमारीला सामोरं जात आहेत. तर सर्वात प्रभावी देशात दक्षिण सूदान पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर सीरिया अरब रिपब्लिक, येमन आणि हैतीसारखे देश आहेत. सध्या फक्त कोरोनाव्हायरसकडे संपूर्ण जग लक्ष देतं आहे, मात्र पुढे उपासमारीचं हे संकट उभं आहे, जे कोरोनापेक्षाही मोठं ठरू शकतं. लॉकाऊननंतर आयुष्यात काय बदल होईल असं वाटतं? या प्रश्नांची द्या उत्तरं
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Food

    पुढील बातम्या