JOIN US
मराठी बातम्या / देश / Lockdownमुळे स्वप्न भंगलं, सिंगापूरमध्ये असलेला शेफ आता चारतोय बकऱ्या!

Lockdownमुळे स्वप्न भंगलं, सिंगापूरमध्ये असलेला शेफ आता चारतोय बकऱ्या!

मात्र लॉकडाऊन झालं आणि हॉटेल बंद पडलं. आशिषला सिंगापूर सोडून भारतात परत यावं लागलं. सुखी आयुष्याचं त्याचं स्वप्न भंगलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

टेहरी 4 जून: कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी जगभर लॉकडाऊन लावलं गेलं. यामुळे कोरोना व्हायरस रोखण्यात अगदी थोड्या प्रमाणात यश मिळालं मात्र त्यामुळे लाखो लोकांवर बेरोरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. आयुष्याचं उज्ज्वल  स्वप्न पाहणाऱ्या तरुणांचं स्वप्न भंगलं. विदेशातल्या लोकांना देशात परत यावं लागलं. तर महानगरांमध्ये राहणाऱ्या लोकांना आपल्या राज्यात परत यावं लागलं. मोठी स्वप्न पाहात सिंगापूरमध्ये गेलेल्या एका तरुणाला आपल्या गावी परत येत आता शेतात बकऱ्या चाराव्या लागत आहेत. उत्तराखंडमधल्या टेहरी भागातले अनेक तरुण हे विदेशात नोकरीसाठी गेलेले आहेत. त्यातले जास्त तरुण हे हॉटेलमध्ये काम करतात. आशिष डंगवाल हा 28 वर्षांचा तरुण दोन वर्षांपूर्वी सिंगापूरच्या एका हॉटेलमध्ये शेफ म्हणून गेला होता. चांगला पगार आणि विकसित देश असल्याने आशिष तिथे चांगला रमला होता. तिथून तो पैसे पाठवत असल्याने त्याच्या पैशावर त्याच्या कुटुंबाची उपजिविका चालत असे. मात्र लॉकडाऊन झालं आणि हॉटेल बंद पडलं. आशिषला सिंगापूर सोडून भारतात परत यावं लागलं. भारतातही रोजगार मिळण्याची लवकरच शक्यता दिस नसल्याने आशिषने आता दुग्धपालनाचा व्यवसाय करायचं ठरवलं. त्याने काही बकऱ्या घेतल्या स्वत:हाच आता तो शेतात त्यांना चारायला घेऊन जातो. हा त्याला बसलेला प्रचंड मोठा धक्का होता. त्या धक्क्यातून सावरत तो पुन्हा नवीन आयुष्याचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या